Yawal

यावल येथे अवैध वाहतुक करणारे डंपर पकडले यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल येथे अवैध वाहतुक करणारे डंपर पकडले यावल पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी
चोपडा ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळू ची चोरटी वाहतूक करणारा डंपर वर फैजपुर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे यावल पोलिस ठाण्यात डंपर चालकासह मालाकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोपडा कडून यावल कडे येणारा रस्त्यावर अवैध वाळू ची वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहीती फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे यांना मिळाली त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे,पोलिस नाईक अल्ताफ अली, आणि पोलिस कॅन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे पथक तयार करून कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आले
पथकाने २१फेब्रुवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळीत फॅरेस्ट नाका जवळ नाका बंदी केली चोपडा कडून यावल कडे येणार डंपर दिसून आला डंपर चालकाची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा त्याचा कडे कोणाता ही परवाना नसल्याचे दिसून आले वाळू भरलेले डंपर यावल पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले
या प्रकरणी पोलिस हेड कॅन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्याद वरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (वय३२) मुमराबाद ता.जि.जळगाव व डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा.कोळन्हावी ता.यावल दोघाविरोधी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पुढील तपास पोलिस हेड कॅन्स्टेबल नितिन चव्हाण करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button