Yawal

यावल पोलीस स्टेशन च्या हददीत अवैद्यधंद्यांना सर्वत्र उधाण

यावल पोलीस स्टेशन च्या हददीत अवैद्यधंद्यांना सर्वत्र उधाण
शब्बीर खान
यावल (प्रतिनिधी) : यावल शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन सर्व प्रकारच्या अवैद्यधंद्यांना उत आले असुन आदीच सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या महामारीत आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरात आणी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे .

दरम्यान यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या अवैदध दारू विक्री सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकाद्याशीर देशी दारू , हातभट्टीची घातक गावटी दारूची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलही या दारू व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे तसेच यावल पोलीस स्टेशनच्या हदीत अवैध्द धंद्दे जोमाने सुरू आहे यामुळे अवैध्द धंदे व्यवसायीक मुजोर झालेले दिसुन येत आहे.

विविध ठीकाणी जुगारीचे अड्डे सुरू असल्याने भुरटया चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे . सार्वजनिक ठीकाणी खुलेआम गुटका विक्री होत असुन असा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना सर्वत्र ऊधाण आले असून, मागील दोन वर्षा च्या कालावधीत कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत लॉक डाऊनच्या संकटकाळात सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असुन , त्या आर्थिक संकटातुन नागरिक बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच यात तालुक्यात शहर परिसर व ग्रामीण क्षेत्रात अवैद्यधंद्यांनी धुमाकुळ माजवला असुन , या सहज मिळणाऱ्या दारू , सट्टा मटका या अवैद्य धंद्यायांच्या माध्यमातुन पैशांच्या प्रलोभनाला बळी पडुन अनेकांचे संसाराच्या राख रांगोळी होवुन त्यांचे संसार उद्धवस्थ होवुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग ओढवु लागले आहे .पोलीस अधिक्षक यांनी स्वतह लक्ष देउन तात्काळ असा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना वेळीच प्रतिबंध करून बंद करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button