Amalner

पाय चाटून झाले असतील तर गां…! तीही चाटून घ्या..!

पाय चाटून झाले असतील तर गां…! तीही चाटून घ्या..!

अमळनेर हे एक असे शहर होते की ज्याला सांस्कृतिक,शैक्षणिक, सामाजिक,वैचारिक,ऐतिहासिक वारसा आहे.असा एक काळ होता की ज्यावेळी ह्या शहराच्या नावाप्रमाणेच निर्मळता होती.संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वेगळेपणामुळे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे अमळनेर ह्या शहराची ओळख होती.ह्या अमळनेर च्या मातीतून अनेक उत्कृष्ट कलाकार,दिगग्ज अधिकारी, राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते, चळवळीचे नेतृत्व घडले .ज्यांनी लोकांच्या मनावरचं नव्हे तर इतिहासात नाव कोरले.महिलांचा सन्मान,निःपक्षपाती समाजकारण, अतिशय खेळी मेळीचे राजकारण की ज्याला एक बौद्धिक आणि वास्तविक किनार होती.कोणतेही कट कपट कारस्थान नसलेलं एकमेकांच्या गळ्यात गळा घालून हसत खेळत शहराचा विकास हे एकमेव ध्येय समोर असलेलं अस अमळनेर च राजकारण आणि समाजकारण..!अगदी दुष्मनी पण काढायची तर नैतिकतेने..!गद्दारी.. पाठीत वार करणे वै विषय नाही..!

पण गेल्या काही वर्षात नावाप्रमाणे अमळनेर च्या स्वच्छ सुंदर वातावरणाला तडा गेला आहे. ह्या शहरात महिलांचा सन्मान तर कमी झालाच पण स्वार्थ साधण्यासाठी अति नीच पातळीवर उतरण्याची देखील कमाल मर्यादा तालुक्यातील लोकांनी ओलांडल्या आहेत.ह्या तालुक्यात पाय चाटून मोठे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे पाय कोणाचे चाटत आहोत याचंही भान पाय चाटणाऱ्यांना राहिलेलं नाही..आता तर इतका कळस गाठला आहे की पाय चाटून झाले असतील तर वर सरकून इतर काहीही चाटायला हे लोक कमी करणार नाहीत.

आणि हे सर्व का तर व्यक्तिगत फायदा,स्वार्थ,दुसऱ्याच खच्चीकरण करणे,एखाद्याच वर्चस्व सहन न होणे,हेल्दी स्पर्धा न करता, खेळाडू वृत्ती न दाखविता प्रगती करत असलेल्या व्यक्तीला इतरांचे पाय चाटून खाली खेचणे यासाठी..!बर ज्यांचे पाय चाटले जातात ते तरी कुठे इथे कायम कार्यरत राहणार आहेत किंवा सत्ता नेहमीच त्यांच्या कडे राहणार आहेत.? ह्याचा विसर पडतो आहे पाय चाटणाऱयांना..!पुढील पिढीला पाय चाटण्याचा,हाजी हाजी करण्याचा वारसा देत आहेत ह्याचा ही विसर पडला आहे. यात जिंकणार कोण मदमस्त सत्ता आणि मग्रूर प्रशासन की आम जनता..?सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या हक्काच्या गोष्टी तुन त्यांच्या करातून तुमची पोट भरतात..!हे विसरू नये पाय चाटणाऱ्यांनी आणि जनतेच शोषण करणाऱ्यांनी..!जागी झालेली जनता खूपच खतरनाक असते हे विसरू नये..!सध्या तरी अंमळनेर च नाव बदलवून पायचाटु नेर असच आहे असं वाटतंय..!बघू यात भविष्यात पाय चाटणारे अजून काय चाटून पुढे जातात..!अशी चर्चा गावात जोरदारपणे सुरू आहे. पाय चाटणाऱ्यांची कमाल मर्यादा अमळनेर कर पाहत आहेत.. चर्चा करत आहेत..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button