Nashik

लहान मुलांना श्रवणदोष असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ला घेऊन उपचार घ्यावेत – ना.डॉ.भारती पवार

लहान मुलांना श्रवणदोष असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ला घेऊन उपचार घ्यावेत – ना.डॉ.भारती पवार

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिल्ली एम्सच्या नवजात शिशु श्रवण स्क्रिनिंग सुविधा, आणि म्हैसूरच्या AIISH, 11 जनसंपर्क सेवा केन्द्र (OSC) यांचे आभासी माध्यमातून उद्घाटन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी श्रवण विकार आणि श्रवणदोष याबाबत समाजामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. “लोकसहभाग आणि लोकचळवळीच्या मदतीने, श्रवण विकाराचे लवकर निदान आणि त्यावर वेळेवर उपचार करण्याबाबत प्रत्येकजण समाजातील सध्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी प्रभावीपणे योगदान देऊ शकतो” असे त्यांनी सांगितले. निदान होऊ शकले नाही आणि उपचार केले नाहीत तर, श्रवणविषयक आजारांचे रूपांतर अपंगत्वात होऊ शकते. त्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो, असे देखील त्या म्हणाल्या. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र येथे जागतिक श्रवण दिनाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय जी ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वर्षीच्या जागतिक श्रवण दिनाची संकल्पना “आयुष्यासाठी ऐका, काळजीपूर्वक ऐका” अशी आहे.
याबाबत जागरुकता निर्माण करण्यात आशा आणि एएनएम, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, परिचारिका यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांनी श्रवणदोषांची लवकर तपासणी आणि निदान करण्यासाठी नागरिकांसह लहान मुलांच्या पालकांना अधिक शिक्षित करण्याचे आवाहन केले. “आपण स्वत:च्या मनाने औषधोपचार करू नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ऐकण्याच्या समस्यांशी संबंधित कोणतीही औषधे घेण्यापूर्वी योग्य खबरदारी घेतली पाहिजे.” असेही सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, मोठ्या आवाजाच्या संपर्कासहीत श्रवणहानी संबंधित जवळपास सर्व कारणे टाळता येतात आणि त्यावर उपचार करता येतात. हे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर परीवर्तन ठरु शकतो, असेही ना.डॉ.पवार या म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविय जी यांचे समवेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी एम्स इथे नवजात श्रवणविषयक स्क्रीनिंग सुविधांचे आणि म्हैसूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (एआयआयएसच) इथे 11 जनसंपर्क सेवा केन्द्रांचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. नवजात, शाळेत जाणारे आणि प्रौढांसाठी गेल्या दोन वर्षांच्या स्क्रीनिंग अहवालासह लहान मुले आणि वृद्धांसाठी श्रवण आणि तपासणीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पुस्तकही प्रसिद्ध केले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, जागतिक श्रवण दिन आपल्याला श्रवणदोषांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. गरोदर स्त्रिया आणि मातांनी या समस्येबद्दल जागरूक राहून श्रवणदोष असल्यास त्यांच्या मुलांवर लवकरात लवकर उपचार करावेत यावर त्यांनी भर दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button