Nashik

मनमाड नगर पारिषद ला दिव्यांगाचा राखिव ५%निधी त्वरीत खात्यात जमा न झाल्यास उद्या प्रहार च्या वतीने टाळा ठोको आंदोलन .

मनमाड नगर पारिषद ला दिव्यांगाचा राखिव ५%निधी त्वरीत खात्यात जमा न झाल्यास उद्या प्रहार च्या वतीने टाळा ठोको आंदोलन .
नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक= मनमाड नगर परिषद ला प्रहार संघटना वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन दृवारे अपंग हक्क पुनर्वसन कायदा १९९५ च्या अंतर्गत शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या एकुण वार्षीक मिळकतीत ५% निधी हा सामान्य अपंगाच्या कल्याणासाठी राखिव ठेऊन खर्च करणे बंधनकारक आहे. सन २०१७ पासुन हा ५% निधी दिव्यांग बांधवांच्या थेट बॅंक खात्यात जमा केला जातो.परंतु चालु वर्षाचा म्हणजे २०२१चा ५% निधी मिळावा या साठी दिनांक ३१/५/२०२१ आपणास विनंती अर्ज दिला होता.
या अर्जाचे स्मरण म्हणुन दिनांक १२/१०/२०२१ रोजी दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करावी असा विनंती अर्ज केला असता सबंधीत अधिकारी श्री. राजेंद्र पाटील यांनी उडवा उडविचे उत्तर देऊन दिव्यांग बांधवांचा अपमान केला.
“आम्ही हक्क मागत आहोत भिक नाही….”परंतु संबधीत अधिकारी हे नेहमी दिव्यांग बांधवांना अपमानास्पद वागणूक देतात या बाबतीच्या तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्या आहेत.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
तसेच दिव्यांग बांधवांचा ५% हक्काचा राखिव निधी जाणुन बुजून रखडुन ठेवल्या बद्दल दिव्यांगाची आर्थिक पिळवणूक केल्या बद्दलही गुन्हा दाखल होऊ शकतो.
त्याच प्रमाणे दिव्यांग योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी नगर परिषदेच्या कार्यालयात दिव्यांग बांधव ये-जा करीत असतात. त्यांना पहिल्या मजल्यावरील कार्यालच्या पाय-या चढ उतार करण्यास अडचण होत होती…या साठी आपल्या कार्यालयामार्फत श्री.राजेंद्र दगुजी पाटील यांना दिव्यांग योजना प्रभावीपणे राबवणे सोईचे होणेकरीता अपंग कल्याण योजना कार्यालय दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या नगिना कॉम्पलेक्स,जयश्री टाॅकीज शेजारील शॉपिंग सेंटर येथे उपलब्ध असलेल्या गाळ्यात दिव्यांग कल्याण योजना कार्यालय तात्काळ सुरू करावे असा कार्यालयीन आदेश असतानाही तब्बल दिड ते दोन वर्षांपासून दिव्यांग बांधवांचे हाल व्हावेत या उद्देशाने कार्यालय उघडण्यात आले नाही जर दिव्यांगांचा हक्काचा ५% राखिव निधी येत्या २५/१०/२०२१ पर्यंत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात जमा नाही झाला व नविन दिव्यांग योजना कार्यालय सुरू करण्यात आले नाही तर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष बबलूभाई मिर्झा, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मानकर, जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर तालुका अध्यक्ष अनिस शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रहार स्टाईलने दिनांक २७/१०/२०२१ बुधवार रोजी मनमाड नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाळे ठोकुन आंदोलन करण्यात येईल…..असा इशारा या निवेदना व्दारे देण्यात आला आहे.
त्यानंतर होणा-या परिणामास नगरपालिका प्रशासन व सबधीत अधिकारी हे जबाबदार रहातील अशा इशारा हिरामण मनोहर. अनिस शेख जिल्हा संपर्कप्रमुख, नांदगाव तालुकाअध्यक्ष जाफर शहा . मनमाड शहर अध्यक्ष सारिका पगारे,शहर सचिवसुरेश गांगुर्डे. सौ. संगिता सांगळे
तालुका सचिव यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button