Parola

आदर्श शिक्षकांकडून यशवंत विद्यार्थिनीचा सत्कार..

आदर्श शिक्षकांकडून यशवंत विद्यार्थिनीचा सत्कार..

देविदास चौधरी पारोळा

पारोळा : तालुक्यातील धुळपिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी कु चिन्मयी दिलीप ठाकरे हिने जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित आँनलाईन अभिव्यक्ती स्पर्धेत द्वितीय गटात द्वितीय क्रमांक पटकावला ! तिचं हे नेत्रदीपक यश तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक स. ध. भावसार यांनी तिला आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, पुष्पगुच्छ, गौरव पत्र,रोख बक्षीस व अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला.आणि पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी अनेकोत्तम शुभ आशीर्वाद दिला !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button