Nashik

ओबीसींच्या न्यायहक्कासाठी मी सदैव पाठीशी – ना.डॉ.भारती पवार

ओबीसींच्या न्यायहक्कासाठी मी सदैव पाठीशी – ना.डॉ.भारती पवार

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्यावतीने नाशिक येथे ओबीसी मोर्चाचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ओबीसी वर्गाला न्याय मिळण्यासाठी त्याला व्यापक जनआंदोलन स्वरूप देण्यासाठी हा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रातील मोदी सरकारमध्ये ओबीसी वर्गाचे 27 मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी वर्गासाठी स्वतंत्र मंत्री खाते दिले. मा पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 27 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण दिले असून त्याचा सुमारे UG च्या 1500 जागा तर PG साठी 2500 विद्यार्थ्यांना कोट्यातून आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकार आपल्या परीने सर्वोतोपरी ओबीसींसाठी प्रयत्न करते आहे परंतु आत्ताच्या राज्य सरकारने ओबीसी वर्गाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असून ह्या आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात जर योग्य प्रतिज्ञापत्र सादर केले असते तर कदाचित ओबीसी वर्गाच्या बाजूनेही निकाल लागला असता. राज्य सरकार फक्त केंद्रासरकारवर सातत्याने टीकात्मक बोलणे एवढेच काम करतआहे. ओबीसींसाठीच्या न्यायहक्कासाठी मी सदैव पाठीशी असल्याचे ना.डॉ.भारती पवार यांनी मेळाव्यात बोलतांना सांगितले. ह्या प्रसंगी भाजपा नेते गिरिषभाऊ महाजन, रामजी शिंदे, जयकुमारजी रावल, आ.देवयानीताई फरांदे, आ.संजयजी कुटे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेशजी टिळेकर, नाशिक भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, आ.राहुलजी ढिकले, शंकरराव वाघ, संजय शेवाळे, सुनीलजी केदार, जगन आण्णा पाटील, सारिकाताई डेरले, योगेशजी मैंद, अंकीतजी संचेती, अजिंक्य साने, शिवाजी बरके, योगेश तिडके, आदेश सानप, रोहित कुंडलवार यांचेसह असंख्य ओबीसी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button