Amalner

अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास अमळनेर-धरणगाव रोडवर आयटीआय कॉलेजजवळ कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात टाकरखेडा येथील रहिवाशी गोकुळ मुरलीधर पाटील यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी संगीताबाई पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार पाटील दाम्पत्य हे गावातून आपल्या शेताकडे जात होते. यावेळी गावातील आयटीआय कॉलेज जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मात्र, पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संगीताबाई यांना पुढील उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत गोकुळ पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पाटील हे भिलाली येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.

संबंधित लेख

Back to top button