Amalner

? प्रेरणादायी..अनाथ भावडांसाठी धावले प्रशासकीय अधिकारी…अनाथांना दिली मायेची ऊब…अधिकार पदांच्या खुर्चीतील माणुसकी…सावित्रीचा वारसा चालविणारे “सिमा”… “मिलिंद”..

? प्रेरणादायी..अनाथ भावडांसाठी धावले प्रशासकीय अधिकारी…अनाथांना दिली मायेची ऊब

अधिकार पदांच्या खुर्चीतील माणुसकी…सावित्रीचा वारसा चालविणारे “सिमा”… “मिलिंद”..

अमळनेर येथील पिळोदे या गावातील रहिवासी लोटन रामराव पवार आणि सुनीता लोटन पवार या दांपत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या 2019 मध्ये केली होती.या नंतर त्यांचे दोन मुले पियुष लोटन पवार ( पाटील) हेमांशु लोटन पवार ( पाटील) हे निराधार झाले.आई वडील दोघांनी आत्महत्या केल्याने या दोन्ही चिमकल्या बालकांचे आयुष्य च बदलून गेले. शिक्षण,अर्थ कारण सर्वच ठप्प झाले.ही दोन्ही मुले शिक्षण सोडून शेतात जाऊन राबू लागले.या परिस्थितीत अमळनेर येथील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी उभारी योजनेंतर्गत सदर कुटूंबाचा अहवाल आणि प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला होता.या अनुषंगाने उभारी योजनेंतर्गत सदर निराधार मुलांना मा उपायुक्त डॉ अर्जुन चिखले यांच्या हस्ते स्मार्ट फोन शिक्षणासाठी देण्यात आला.

हे अधिकारी एव्हढ्या वरच थांबले नाहीत तर दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च मा उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी उचलला आहे.अमळनेर तालुक्यातील हे अत्यन्त दुर्मिळ असे उदा असून अधिकारी नेहमीच वाईट असतात असे नाही. अधिकाऱ्यांची खुर्ची ही काटेरी असते तिथे बसून प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था राखत नियोजन करणे हे तसे कठीणच कार्य …पण अमळनेर येथील या दोन्ही अधिकाऱ्यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

अर्थ सहाय्य करण्याच्या उद्देशाने गेलेले अधिकारी सिमा अहिरे,मिलिंदकुमार वाघ यांना जेंव्हा कळले की ही मुले शेतात मोल मजुरी करण्यासाठी गेले आहेत तेंव्हा त्यांनी आपल्या संपूर्ण पथकासह शेताची वाट धरली आणि तिथे या निराधार मुलांशी संवाद साधला. मुलांकडे मोबाईल नसल्याने कोरोना काळात सुरू असलेले ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते ताबडतोब दोन्ही अधिकाऱयांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना मोबाईल आणावयास सांगितले आणि डॉ अर्जुन चिखले यांच्या उपस्थितीत मुलांकडे सुपूर्त केले.या मुलांच्या कपडे,दप्तर,शिक्षण इ चा खर्च हे दोन्ही दिलदार अधिकारी उचलणार आहेत.

खरंच माणुसकी अजून संपत नाही म्हणूनच हा देश आणि माझा महाराष्ट्र कधी थांबत नाही.असे दिलदार व्यक्तिमत्व जो पर्यंत आपल्यात आहेत तोपर्यंत या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार सरणीला हरवू शकणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button