India

मिठी मारताय.. मारलीच पाहिजे…! हग..कडलिंग.. जादू की झप्पी चे जादुई फायदे..! तणावापासून मुक्तता..!

मिठी मारताय.. मारलीच पाहिजे…! हग..कडलिंग.. जादू की झप्पी चे जादुई फायदे..! तणावापासून मुक्तता..!

मिठी हा शब्द ऐकला की आठवतात ते फक्त प्रियकर प्रेयसी…मिठी फक्त प्रियकर आणि प्रेयसी च मारत नाही.मिठी म्हटली म्हणजे आठवतो तो मुन्नाभाई एमबीबीएस ह्या चित्रपटातील जादू की झप्पी म्हणणारा संजय दत्त…मित्रानो मिठी ही आई मुलाला मारते,बहीण भावाला आपले अगदी जवळचे व्यक्ती आपला पार्टनर, किंवा मित्र-मैत्रीण, पालक हे मिठी घेतात. मिठी मारून कुरवाळण्याचे खूप सारे फायदे आहेत.
मिठी हे केवळ प्रेमाचं हे प्रतिक वाटत असलं, तर तुम्ही दुस-याला मारलेली मिठी ही तुम्हा दोघांचं शरीर सुदृढ ठेवत हा विचार कुणीच केला नसेल…चला तर मग जाणून घेऊ फायदे…
तुम्हला माहीत आहे का दिवसभरात किमान एकदा तरी आवडत्या व्यक्तीला मारलेली मिठी किंवा रात्री झोपताना, केलेलं कडलींग संपुर्ण दिवसभराचा थकवा नाहीसा करतो.
जेणेकरून एक वेगळीच एनर्जी निर्माण होते ज्यामुळे मन, मेंदू तणावमुक्त होते. तसंच एका जोडप्यामधल रिलेशनशिप डेव्हलप करायला सुद्धा हा प्रकार फार उपयोगी असतो.

  • हृदय राहत तंदुरुस्त

लंग्स आणि हृदय यांच्या मध्ये एक छोटासा भाग असतो ज्याच्या मदतीने रक्तदाबावर नियंत्रण राहतं आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या घट्ट मिठीने हा भाग अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी करायला मदत होते.
वैज्ञानिकांच्या मते कडलिंगचे फायदे महिलांना जास्त आहेत पण पुरुषांना सुद्धा खूप फायदा होतो.शरीरातील रक्ताभिसरण वेगात होते.हृदयाचे ठोके वेगात पडतात आणि त्याचा फायदा रक्ताभिसरण होते आणि हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

  • शारिरीक किंवा मानसिक दुःख कमी होते

कोणतीही शारिरीक जखम किंवा इजा झालेल्या व्यक्तीला आपल्या जवळच्या माणसाने एक घट्ट मिठी मारली, जवळ घेऊन कुरवाळलं तर त्याचं दुःख थोडफार तरी नक्कीच कमी होतं आणि त्याच समाधान समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतं.
जे शारिरीक दुःखाच तेच मानसिक दुःखाच सुद्धा, समोरच्या व्यक्तीला मन मोकळं करायला एक मिठी सुद्धा पुरेशी असते,
त्या एका मिठीमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की आपलं ऐकून घ्यायला कुणीतरी आपल माणूस आहे. मिठी ही केवळ शारिरीक गरज नसून, मानसिक गरज आहे, हे लक्षात ठेवा.

  • शारीरिक आजार कमी होतात

मिठी मारण्याने किंवा कडलिंग मुळे फक्त मनावरचा ताण हलका होतो अशातला भाग नाही तर त्यामुळे जे व्हायरस हवेत असतात त्यापासून सुद्धा आपले संरक्षण होते आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.
जसं की सर्दी खोकला या अशा किरकोळ आजाराचे व्हायरस आणखीन पसरू नये यासाठी या कडलिंग चा खूप उपयोग होतो हे सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

  • पार्टनरशी सबंध अधिक गहिरे होतात

एका नात्यात दोघांची मन जुळणं महत्वाचं असतं तसं त्या दोन व्यक्तींच्या शारीरिक गरजा सुद्धा पूर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं असतं.
ज्या जोडप्यांना आपलं शारीरिक आयुष्य सुखी हवं असेल, त्या जोडप्यांनी कडलिंग, किसींग या अशा गोष्टींकडे एक थेरपी म्हणून बघणं गरजेच आहे. या थेरेपीचा पुरेपूर वापर केल्यासं जोडपं हे सदैव सुखी, निरोगी आणि तणावमुक्त आयुष्य जगतं हे कित्येक प्रोफेशनल डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

  • शांत झोप लागते

पार्टनर ची झोप ही खूप सावध असेल किंवा शांत नसेल तर अशा लोकांचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता जास्त असते,
कारण एक परिपूर्ण निरोगी आयुष्य जगायला लागणारी शांत झोप कधीच त्यांच्या नशिबी नसते. अशा प्रॉब्लेम्स वर कडलिंग हा अतिशय उत्तम उपाय आहे.
जर तुम्ही तुमच्या पार्टनर ला कुशीत घेऊन झोपलात तर तुमच्या त्वचेच्या स्पर्शाने सुद्धा समोरच्याचा मनावरचा ताण कमी होऊन शांत झोप लागायला मदत होते.

  • आई आणि बाळाची मिठी सर्वात उपयोगी

आई तान्ह्या बाळाला अंगावरच दूध पाजते किंवा वडील लहान बाळाला कुशीत घेऊन त्याचे लाड करतात यामुळे सुद्धा त्या बाळाचे आरोग्य उत्तम राहू शकतं,
खासकरून बाळाची त्वचा इतकी नाजूक असते की त्या कडलिंग चे फायदे लगेच दिसून येतात, जसं की बाळाचे रडणे कमी होतं किंवा बाळाला अगदी शांत झोप लागते त्यामुळे हे कडलिंग जितकं आपल्याला फायदेशीर आहे तितकच लहान बाळांसाठी सुद्धा उत्तम आहे.

  • राग कमी होतो

सगळ्यांना मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमातली संजय दत्त ची जादू की झप्पी माहीत असेलच तर त्यामागे फक्त हा सिनेमा नसून शास्त्रीय कारण आहे.
एखादा माणूस रागावला असेल किंवा त्याची जास्त चिडचिड होत असेल तर एक मनापासून मारलेली घट्ट मिठी त्या माणसाचा राग एका झटक्यात घालवू शकते, कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील चांगल्या भावना नकळत समोरच्या व्यक्तीमध्ये पाठवता यालाच इंग्रजी मध्ये Good/Positive vibes असे देखील म्हणतात.
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण महागड्या जीमवर खर्च करता, जीभेवर ताबा ठेवून डाएट करता. मानसिक ताण कमी करण्यासाठी आपण अनेक थेरेपी करतो. मात्र या सगळ्यांत घरबसल्या केला जाणा-या कडलिंगचा उपाय एकदा तरी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button