Kolhapur

बालदिनानिमित्त ऊर्जा क्रिएशन आजरा यांच्यामार्फत विद्यामंदिर साळगाव शाळेला पुस्तके भेट.

बालदिनानिमित्त ऊर्जा क्रिएशन आजरा यांच्यामार्फत विद्यामंदिर साळगाव शाळेला पुस्तके भेट.

सुभाष भोसले-कोल्हापूर
दि 14 नोव्हेंबर विद्या मंदिर साळगाव येथे बाल दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच उपस्थितांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बालदिनाचे औचित्य साधून अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेली पुस्तके व ऊर्जा क्रिएशन आजरा यांच्यावतीने शालेय उपयोगी पुस्तके विद्यामंदिर साळगाव शाळेस सप्रेम भेट देण्यात आली.

शाळेच्या मुख्याध्यापिका कमल साठे यांनी शाळे विषयी सविस्तर माहिती दिली तसेच शिक्षक संघाचे अध्यक्ष मायकल फर्नांडिस यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त व वाचन चळवळी निमित्त बहुमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात विद्यामंदिर साळगाव शाळा तंबाखूमुक्त झाल्यामुळे मुख्याध्यापक यांना मायकेल फर्नांडिस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मास्टर ट्रेनर श्री मिटके यांना वृशाल हुक्किरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऊर्जा क्रिएशन च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देण्यात आली तसेच कमल साठे यांच्या वतीने त्यांची नात तन्वीच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आल्या. यावेळी ऊर्जा क्रिएशन चे अध्यक्ष वृषाल हुक्किरे , सदस्य मायकेल फर्नांडिस , शिवाजी सावंत तसेच साळगाव गावचे सुपुत्र अमोल पाटील तसेच महेश निऊंगरे, प्रसाद केसरकर आदी सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान सोन्ने यांनी केले व आभार अरविंद पुलगुर्ले यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button