Amalner

हॉटेल राजा गार्डन 30 हजार रु ची बोगस दारू जप्त..!राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही..!अखेर जागे झाले डिपार्टमेंट..!

हॉटेल राजा गार्डन 30 हजार रु ची बोगस दारू जप्त..!राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही..!अखेर जागे झाले डिपार्टमेंट..!

अमळनेर येथे अवैध धंदे जोरात सुरू असून तालुक्यात दारूचा महापूर वाहत असतो.अमळनेर येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग हा नावालाच अस्तित्वात आहे.या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगांव अधिक्षक धार्मिक साहेब यांना वारंवार तक्रारी देखील पुरावयांसह केल्या आहेत. पण ना ही जळगाव आणि ना ही अमळनेर विभागाला जाग येत होती.पण आता कुठेतरी राज्य उत्पादन शुल्क विभाग अस्तित्वात आहे याची आज जाणीव झाली आहे.अमळनेर येथील राजा गार्डन हॉटलमध्ये तब्बल १३५ बोगस दारू च्या बाटल्या आढळून आल्या असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही केली आहे.

या हॉटेलचे मालक खेडी येथील गोकुळ पाटील व चालक संजय पाटील हे असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे रोडवरील राजा गार्डन हॉटेलवर मंगळवारी संध्याकाळी छापा टाकून ३० हजार रुपये किमतीची बोगस दारू जप्त केली आहे.यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.धुळे रोडवरील राजा गार्डन हॉटेल येथे बोगस दारू दिली जात असल्याची तक्रार उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी या हॉटेलवर धाड टाकून मद्यसाठ्याची तपासणी केली असता यात ३० हजार रुपये किंमतीच्या १८० मिली मीटरच्या १३५ बॉटल जास्तीच्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या मद्य साठ्यात विसंगती आढळून आली आहे. साठ्या पेक्षा अधिक दारू ही शासन मान्य एफएल वन तर्फे न घेण्यात आल्याने ती बोगस असण्याची शक्यता आहे. आल्याने दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट आणि हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील यांनी मुंबई विदेशी दारू अधिनियम १९५३ अन्वये मुद्देमाल जप्त करून कार्यवाही सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button