Bollywood

रामसे बंधूंचा जीवनपट की हॉरर पट..!पहा हा हॉरर जॉनर..!डरना जरुरी है..!

रामसे बंधूंचा जीवनपट की हॉरर पट..!पहा हा हॉरर जॉनर..!डरना जरुरी है..!

मुंबई बॉलिवूड चित्रपटात हॉरर हा एकमेव असा जॉनर आहे जो खूप इंडस्ट्रीत फार कमी हाताळला जातो.सध्या वेब सिरीज मध्ये हॉरर जॉनर चा चांगलाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला.हिंदीत राम गोपाल वर्मा आणि महेश कोठारे सारख्या काही नावाजलेल्या कलाकारांनी हे असे सिनेमेसुद्धा सॉलिड कमाई करू शकतात हे दाखवून दिलं.
पण हिंदी चित्रपटसृष्टीला हॉररचा जॉनर बहाल करणारं नाव म्हणजे “रामसे ब्रदर्स”. जेंव्हा हिंदी सिनेमा नायक नायिकांचा रोमान्स आणि खलनायकीत अडकला होता तेव्हा रामसे बंधूंनी या नवा जॉनरची ओळख करुन दिली.
सातत्यानं हॉररपट बनवून हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना याची चटक लावली. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा हा सर्वात जास्त बघितला जाणारा जॉनर आहे ज्याची मुळं रामसे बंधूंच्या हॉररपटात आहेत.

कोण होते रामसे
रामसेचे मुळ नाव रामसिंघानी होते मात्र रामसिंघानिचे रामसे झाले. पाकिस्तानात मूळ असलेले रामसेचे वडील फतेहचंद रामसिंघानी यांचं स्वातंत्र्य पूर्व काळात कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघनी हे मोठं नाव रामसे झालं .
१९४७ ला देशाची फाळणी झाल्यानंतर फतेहचंद रामसे मुंबईत आले. मुंबईत देखील फतेहचंदांनी लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान रामसे नावाने सुरू केलं.

धंदा ठिक ठाक सुरू होता तेंव्हा फतेहचंदानी सिनेमा निर्मितीकडे वळले.१९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फतेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फारसा चालला नाही.
यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फतेहचंदांच्या नावावर एक फ्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली.
एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फतेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं
त्यांनी हा निर्णय घेतला पण लवकरच भारतीय भयपटा चे ते जनक बनणार होते आणि हे घडायला कारण ठरला फ्लॉप चित्रपटातला एक सिन.

फतेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकामध्ये बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजतील एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले.
त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालीचे उत्कंठित झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात.
तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते.
पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.
चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फतेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला.
वडिलांनी होकार कळवला असला तरी पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली.
पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं.
मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉररपटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियल लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं.
चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.
कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तूफान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत.

कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंडचं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.

भारतात जेंव्हा खाजगी वाहिन्या आल्या तेंव्हा रामसे बदर्सनी आपला मोर्चा तिकडे वळवत भारतीय टेलिव्हिजना पहिली हॉरर मालिका दिली,” झी हॉरर शो’. १९९३ साली हा शो झी टिव्ही वरून एअर केला गेला.
तब्बल पाच वर्षं हा शो सादर केला गेला. छोटा असो की मोठा पडदा रामसे बंधू हे नाव येतं तेंव्हा “डरना जरूरी है” असंच म्हणावं लागतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button