Amalner

अमळनेर येथील सत्तार मास्टर शरफे एजाज खादिमें कौम खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर येथील सत्तार मास्टर खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर येथील अब्दुल सत्तार मास्टर खान्देश यांना रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे नेते हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.

जळगाव येथील हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमात अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ समाजसेवक व निवृत्त ऊर्दू शिक्षक अब्दुल सत्तार मास्टर तेली यांना शरफे एजाज खादिमें कौम खान्देश रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एजाज मलिक, नगरसेवक ईबा पटेल, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, मजीद झकेरिया, पारोळा येथील हाजी महमंद खाटीक, भुसावळचे मुन्ना तेली, चाळीगांवचे अलाउद्दीन शेख, राष्ट्रवादीचे अक्रम तेली यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. याप्रसंगी हाजी अब्दुल कादर जनाब, अँड साजिद शेख, इकबाल शेख इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button