Amalner

?️अमळनेर कट्टा..रेशनचा काळा बाजार उघड…रेशन माफियांचा गोरख धंदा…गरिबांचे अन्न हिसकावून काळ्या बाजारात सर्रास विक्री..!कोणाचा आहे वरदहस्त..!

?️अमळनेर कट्टा..रेशनचा काळा बाजार उघड…रेशन माफियांचा गोरख धंदा…गरिबांचे अन्न हिसकावून काळ्या बाजारात सर्रास विक्री..!कोणाचा आहे वरदहस्त..!

आज दि. 15.01.2021 रोजी तहसील कार्यालयाच्या बाहेर रेशन चे तांदूळ घेऊन जाणाऱ्या वाहनाला सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी अडविले व उपविभागीय अधिकारी यांना यासंदर्भात माहिती दिली. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की आज दि रेशनचा तांदूळ बेकायदेशीर रित्या गाडीत भरला जात असल्याची माहिती राकेश पाटील रा अमळनेर यांना मिळाली होती.या माहितीनुसार राकेश पाटील यांनी सदर ठिकाणी जाऊन लक्ष ठेवले व तहसील कार्यालयाच्या समोर सदर वाहन अडवून उपविभागीय अधिकारी यांना माहिती देऊन शासकीय कर्मचारी पाठविण्यास सांगितले.या नुसार संतोष बावणे नायब तहसीलदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चौकशी करून सदर महिंन्द्रा डी.आय. वाहन क्र एम.एच 19 एस.8285 या वाहनात रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात विक्री करीता अमळनेर येथुन पारोळा येथे जात आहे अशी खात्री केल्या नंतर तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यात आले. यानंतर सदर वाहन अमळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाचे नायब तहसीलदार संतोष बावणे हे फिर्यादी असून तपास अधिकारी अंबादास मोरे हे आहेत.

तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी कार्यालयातील गंगाधर गिरथर सोनवणे (लिपीक), रोहीत पोतदार इ पस ऑपरेटर), तसेच पंचनाम्यातील पंच श्री राकेश सुरेश पाटील, श्री. पंकज प्रकाश भोई यांच्या समक्ष तहसील कार्यालयात वाहनाची पडताळणी केली

सदरचे वाहन हे रेशनचे 30 क्विंटल तांदुळ 60 कट्ट्यात घेऊन आरोपी दिपक रमेश पाटील वय 36 रा नित्यानंद हस्पीटलच्या मागे मनोज अपार्टमेंट पारोळा तांदुळ हा सौरभ ट्रेडर्स भुमार मालाचे ठोक किरकोळ विक्रेता मार्केट यार्ड येथून विकत आणला असून त्यांनी सौरभ ट्रेडर्सची छापील पावती दिली आहे.200000/-रु किमतीची पिकअप आणि 30 क्विंटल भाव 1500 रुपये प्रति क्विंटल असा 45000/- रु प्रमाणे एकूण 245000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरचा माल माल सुरेश सोनजे पारोळा मार्केट यार्ड भुसार मालाचे व्यापारी यांच्या कडे जात असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button