Parola

पारोळा येथील महावितरण कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा

पारोळा येथील महावितरण कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा येथील म रा वि वि कंपनीतील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री संदीप नामदेव सोनवणे हे दिनांक २३/१०/२०२० रोजी काम आटपून येत असताना कजगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपा जवळ त्यांना पैसे व ATM कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट सापडले व त्यांनी पाकिट उघडले असता ते देवगाव येथील श्री महेश दत्तात्रय पाटील,रा देवगाव यांचे असल्याचे समजले त्यांनी लगेच देवगाव येथील मित्र सागर पाटील, MSEB रा. देवगाव यांना संपर्क साधून संबंधितांना आज दिनांक २५/१०/२०२० रोजी त्यांचे पाकीट व रोख रक्कम ६०००/- रुपये सुपुर्द केले . आजकाल माणुसकी व इनामदारी कमी कमी होत असताना संदीप भाऊ यांच्या प्रमाणिकपणा बद्दल
सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
म. रा .वि. वि. विभागात संदीप सोनवणे हे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जातात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button