Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र रक्तवाढी साठी चे घरगुती उपाय

आरोग्याचा मुलमंत्र

रक्तवाढी साठी चे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या पेक्षा महिलांना जास्त त्रास देते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक एनिमियाचे शिकार होतात. एनिमियाच्या रूग्णा मध्ये विटामिन बी, लोह तत्व, फोलिक एसिडचे प्रमाण कमी होते. कधीकधी अनुवांशिक कारणामुळे देखील हा रोग होऊ शकतो.

या वस्तू घेतल्यामुळे रक्त वाढ होते आणि एनिमिया दूर होतो.

1.एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.

2.सोयाबीन मध्ये विटामिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.

3.थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूस मध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

4.गुळा सोबत शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील आयरन वाढते.

5.एनिमियाच्या आजारात पालक औषधा सारखे काम करते. पालक मध्ये विटामिन ए, सी, बी 9, आयर्न, फाइबर आणि कैल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एकावेळीच वीस टक्के पर्यंत आयर्न वाढवू शकते. पालक तुम्ही भाजी अथवा सूप करून करू शकतात.

6.रक्त वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणून तुम्ही टमाटर वापरू शकता. ताबडतोब रक्त वाढीसाठी एक ग्लास टमाटयाचा रस प्यावा. तुम्ही सूप करूनही पिऊ शकता, वाटल्यास सफरचंद आणि टमाटरचे ज्यूस एकत्र करून पिऊ शकता.

7.बॉडी मधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे पण खाणे फायदेशीर होईल. हे पोष्टिक असतात तुम्ही हे भाजून किंवा उकळवून खावू शकतात.

8.थोडेसे मध एक ग्लास बीटच्या रसात मिक्स करून पिण्यामुळे शरीराला आयरन अधिक प्रमाणात मिळते ज्यामुळे रक्त तयार होते.

9.हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी थोडेसे मीठ लसणा मध्ये मिक्स करून चटणी बनवा. ही चटणी खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.

10.शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे.

11.एक ग्लास सफरचंद ज्यूस घ्यावे. त्यामध्ये एक ग्लास बीटाचा रस आणि चवीनुसार मध मिक्स करा. हे दररोज प्या. या ज्यूस मध्ये लोह तत्व अधिक असते.

12.2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट बनवा. यामध्ये 1 चमचा मध टाका आणि दिवसातून दोन वेळा हे खावे.

13.पिकलेल्या आंब्याचा गर दुधा सोबत घेतला गेल्यास रक्तवाढ होते.

14.पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या भोजना मध्ये समाविष्ट करा

15.जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्ताची कमी होते नाही.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button