India

आरोग्याचा मुलमंत्र..पोट विकार आणि अपचनावर घरगुती उपचार

आरोग्याचा मुलमंत्र..पोट विकार आणि अपचनावर घरगुती उपचार

खाल्लेलं अन्न न पचणे म्हंजेच अपचन होय. जेवण केल्यानंतर जड वाटणे सुस्ती येणे याला अपचन म्हणतात.

अपचन झाल्याचे लक्षणे:

पोट जड होणे, जिभेवर पांढरा थर होणे, पोट दुखणे व फुगणे , दिवसभर सुस्त वाटणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षण आढळून येतात.

अपचन टाळण्यासाठी काय खावे:

मूग, भात, लाह्या, ज्वारी, पपई, संत्रे, दोडका, मेथी, पालक, सुंठ, जिरे, सुरण, लसूण, ताक, गरम पाणी इत्यादी सेवन करावे.

अपचन पासून वाचण्यासाठी काय खाऊ नये:

वटाणे, मटार, चवळी इत्यादी कडधान्य, रताळे साबुदाणा, तळलेले पदार्थ, जड मिठाई, थंड पाणी, शिळे पदार्थ इत्यादी पासून दूर राहावे.

अपचनावर घरगुती उपचार:
अपचनावर सर्वात सोपा व खात्रीच उपाय म्हणजे उपवास करणे व हलका अहार घेणे. दुपारी हलके जेवण करून रात्री काहीही खाऊ नये. किंवा केवळ पालक सूप घ्यावे. दिवसभर गरम पाणी प्याव जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा, चिमूटभर सैंधवाबरोबर चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी पिल्यास खाल्लेलं लवकर पचते.
अपचनामुळे पोटात वायू धरत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास अर्ध्या लिंबाबच्या रसात दोन चिमूट हिंग व थोडे सैंधव टाकून घ्यावे. याने अपचन कमी होते व भूक वाढते. जेवणा आधी अर्धा चमचा जिरेपूड व एक दोन चिमूट सुंठीचे चूर्ण लिंबाच्या रासाबरोबर घावे. अपचन होणार नाही आणि भूक वाढेल. तसेच खाल्लेलं सर्व पचेल.

जेवण वेळेवर करावे.
दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपूड, चिमूटभर सुंठ, व किंचित सैंधव टाकून घ्यावे. जेवणामध्ये आल्याचा तुकडा हिंग व सैंधव घालून खावा. जेवणा नंतर लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चघळल्याने पचनास मदत होते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button