Mul, chimur

मूल दौऱ्यावर महाविकास आघाडीचे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री आद.नाम.विजयभाऊ वडेटटीवार यांना होमगार्डचे निवेदन

मूल दौऱ्यावर महाविकास आघाडीचे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री आद.नाम.विजयभाऊ वडेटटीवार यांना होमगार्डचे निवेदन

प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

आज मूल दौऱ्यावर महाविकास आघाडीचे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री आद.नाम.विजयभाऊ वडेटटीवार जी याचं मूल येथे आगमन होताच महाराष्ट्र पोलिस बॉइज असोसिएशन मूल चे तालुका अध्यक्ष,तथा ग्राम.प.सदश्य प्रशांत भाऊ गट्टूवार यांचे नेतृत्वात सर्व होमगार्ड्स ना घेऊन रस्त्यावर उतरून निवेदन देऊन आपली व्यथा मांडण्यात आली. ड्युट्यावरुंन कुठलाही कारण न देता अचानक कमी करून घेतल्या मुळे सर्व होमगार्ड्सवर व त्यांच्या परिवरावर उपासमारीची पाळी आली,त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या अन्यायसाठी मान.नाम.पालकमंत्री वडेटटीवार जी यानी आस्वासन दिले की लवकरात लवकर हे प्रकरण निकाली लावू.

यावेळी उपस्थित सिद्धार्थजी रामटेके तालुका समदेशक,चंद्रकांत रामटेके लिपिक,रवि शेंडे,भारत वाळके,वामन नेवारे,रवि भेंडारे, लक्ष्मण ढोले,मोरेश्वर ठाकरे,सारिका घुगरे,मंगला नागापुरे,सोनिया डोरलिकर,वनिता भेंडारे,मालती आरेवार,विजया बोकारे,नीता सुखदेवे, कल्पना लेनगुरे व मूल तालुक्यातील असंख्य महिला पुरुष होमगार्ड्स उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button