Nandurbar

दुकाने आठपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

दुकाने आठपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

नंदुरबार फहिम शेख

शासनाने निर्बंध उठवले; जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिले आदेश

नंदुरबार राज्य शासनाने ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचे निश्चित केले होते. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी आदेश काढून सर्व दुकाने व बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ आणि शनिवारी दुपारी ३ या कालावधीत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आणि सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. नागरिकांनी चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटाईज करणे या मार्गदर्शक सूचनांचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. राज्यशासनाने सोमवारी निर्बंध शिथिल केल्याचे आदेश केले होते, परंतू जिल्हाधिकारी यांना आदेश प्राप्तः झालेले नसल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी याबाबत आदेश काढून नागरीकांना दिलासा दिला. मंगळवारपासून हे आदेश लागू झाल्याने दीड महिन्यानंतर सायंकाळी दुकाने उघड़ी होती. मंगळबाजार, पालिका चौक, सिंधी कॉलनी या भागात अनेक जण पाच नंतर बाजारपेठेत आले होते. नेहरु चौकातील भाजीपाला बाजार आठ सुरु असल्याने याठिकाणीही दीड महिन्यानंतर वर्दळ निमन आलीनिबंध शिथिल झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी बाजारपेठेतील दुकाने अशी सुरु होती. सायंकाळी दुकाने सुरु असल्याने रस्त्यावर असा झगमगाट दिसून आला. बाजारात गर्दी होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button