Jalgaon

दिव्यांग बांधवांची झाली दैना..प्रशासनाला जागच येईना..

दिव्यांग बांधवांची झाली दैना प्रशासनाला जागच येईना

प्रतिनीधी प्रविण काटे

कोरोना महामारी आजारामुळे अपंग बांधवांना दिले जाणारे UDID कार्ड हे गेल्या काही महिन्यांपासून शासनाचा कोविड प्रतिबंधक साथी मुळे बंद होते. कोविड ची साथ आता ओसरू लागल्याने सदरील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दिव्यांग UDID कार्ड काढणयासाठी जळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये 200 अपंग बांधवांना कूपन पद्धतीने तपासणी साठी सदरील हॉस्पिटल ने निर्णय घेतला होता जेणेकरून अपंग बांधवांची होणारी गर्दी टाळता येईल व कोविड चे नियम पळता येतील पण आज दिनांक 04/08/2021 रोजी हजार ते 1500 दिव्यांग बांधव हे सकाळी 6 वाजेपासून लाईन मध्ये उभे होतें. व सदरील सिव्हील हॉस्पिटल च्या ढोबळ कारभाराने दिव्यांग व्यक्तींना कधी इकडे लाईन लावा कधी तिकडे लाईन लावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या ने दिव्यांग बांधवांची तारांबळ उडाली व ह्यात अपंग बांधवांना धक्का बुकी चा प्रकार ही घडून आला ह्या ढोबळ कारभाराणे अपंग बांधवांना मानसिक त्रास सहन करावा लागला व अपंग बांधवांना सरकार व हॉस्पिटल विषयी नाराजी व्यक्त केली व प्रशासनाने आमच दुःख समजून घ्यावं व योग्य ते नियोजन करून आमच्या समस्या तातडीने सोडवाव्यात या भावना व्यक्त केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button