Jalana

मंडळ दिनी राष्ट्रीय समाज पक्षाची भव्य रॅली व आढावा बैठक.

मंडळ दिनी राष्ट्रीय समाज पक्षाची भव्य रॅली व आढावा बैठक.

संजय कोल्हे
अंबड/राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक तसेच भव्य रॅलीचे दि.०७ रोजी सकाळी ९ वाजता जय मल्हार ट्रेडर्स येथे आयोजित करण्यात आली आहे.
या मंडळ स्तंभ दिनी बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रत्नाकर गुट्टे,शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष रासप महासचिव बाळासाहेब दोडतले,रासपचे प्रदेश प्रवक्ते भास्कर टेकाळे ,मराठवाडा संपर्क प्रमुख तथा नगरसेवक अशोक लांडे, जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर, जिल्हाध्यक्ष इंजि. बाबासाहेब भोजने युवक जिल्हाध्यक्ष गोविंद जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.

रासपाच्या आढावा बैठकीनंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महात्मा ज्योतिराव फुले चौक,महावीर चौक मार्गे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या महामानवांना अभिवादन करून रॅली दोदडगाव कडे रवाना होईल. दोदडगाव येथे मंडल स्तंभाजवळ अभिवादन सभा होणार आहे. या सभेस जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अंबड शहराध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button