Faijpur

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

एच्.एस्.सी.2021या परीक्षेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयातून २३७ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.यात विज्ञान, कला व वाणिज्य या तीनही शाखांमधील सगळे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल १०० % लागलेला आहे . विज्ञान शाखेतून प्रथम सायली सुभाष पाटील ९०.५०% द्वितीय दर्शना चंद्रकांत चौधरी ९०.१६% तर तृतीय शितल अनिल आमोदकर ८९.५०% या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कुमुद किरण जैन ९२.८३% , द्वितीय सायली अनिल जैन ८८.३३% तर तृतीय क्रमांक प्रतिक देवेंद्र ठाकुर ८७ % या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत . कला शाखेतून दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.ते सायली भरत नेहेते ९१ % , पियुष यशवंत कपाटे ९१ % याप्रमाणे होत.द्वितीय क्रमांक सोनाली अशोक तायडे ७५.३३ % तर तृतीय धिरजसंजय तायडे ७५.१६ % क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयाच्या एम .सी व्ही.सी.विभागातून एकूण ४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यांचा निकाल १०० % लागलेला असून त्यात प्रथम समीर अमन तडवी (इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी) ६४ % , द्वितीय श्वेता दिलीप चौधरी ( ऑटो मोबाईल टेक्नॉलॉजी)६३.६६ % आणि तृतीय डिगंबर जगदीश पालक (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी) ६३ % या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळ या संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री.शिरीषदादा मधुकरराव चौधरी , उपाध्यक्ष , सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सर , उपप्राचार्य , कनिष्ठ महाविद्यालयाच्या इन्चार्ज प्रा.वंदना बोरोले तसेच शिक्षकवृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button