Amalner

दुष्काळ Live…ठोस प्रहार बातमीचा दणका…आणि आजी माजी लोकप्रतिनिधींना आली जाग.. कोणी दिले निवेदन तर कोणी पोहचल बांधावर…

दुष्काळ Live…ठोस प्रहार बातमीचा दणका…आणि आजी माजी लोकप्रतिनिधींना आली जाग.. कोणी दिले निवेदन तर कोणी पोहचल बांधावर…

अमळनेर तालुक्यात सध्या कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.आधीच कोरोनाच्या आपत्ती काळात जन सामान्य जनता हैराण परेशान झाली आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात देखील अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुबार पेरणी नंतर आता तिबार पेरणीचे संकट समोर उभे राहिले आहे. कर्ज काढू,उसनवारी करून साधारण शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. आणि आता 50% देखील पाऊस झालेला नाही परिणामी पिके करपू लागली आहेत. या अनुषंगाने ठोस प्रहारने लोक प्रतिनिधींना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बातमी प्रकाशित केली होती. आमदार हे उद्दघाटने, भूमीपूजने यात व्यस्त असल्याची स्पष्ट भूमिका मांडत शेतकऱ्यांचे मनोगत देखील जाणून घेऊन सत्य परिस्थिती मांडली होती.परिणामी आजी माजी लोक प्रतिनिधींना जाग आली असून आमदार मुडी येथील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहेत तर माजी विधान परिषद आमदार यांनी दुष्काळ ग्रस्त परिस्थिती संदर्भात प्रशासनाला पत्र दिले आहे.असो कमीत लोक प्रतिनिधींना जाग तर आली..हे ही नसे थोडके…

ठोस प्रहारच्या दुष्काळ Live च्या बातम्यांचे सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यातील बळीराजाने अभिनंदन व कौतुकाचा आशिर्वाद दिला आहे.निर्भीडता आणि सत्यता हेच ठोस प्रहारचे उद्दिष्ट आहे.संपूर्ण महाराष्ट्रात अश्या तऱ्हेच्या बातम्या प्रकाशित होत असतात आणि प्रशासन व लोक प्रतिनिधींना जागे करण्याचे काम ठोस प्रहार करत असते.ठोस प्रहारचे संपुर्ण जगात वाचक आहेत.परिणामी आपल्या छोट्या अमळनेर तालुक्याचा छोटा किंवा मोठा प्रश्न देखील एकाच वेळी संपूर्ण जगाला कळत असतो…नुकतेच शेतकऱ्यांनी मा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असून लवकरच स्वतः जिल्हाधिकारी पाहणी दौऱ्यावर येणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button