Nandurbar

तळोदा येथील व्यापाऱ्याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणाऱ्या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

तळोदा येथील व्यापाऱ्याचे चारचाकी वाहनातुन पैसे चोरणाऱ्या ४ आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : दिनांक ०५/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वा. सुमारास तळोदा येथील किराणा मालाचे व्यापारी हुकुमचंद घिसुमल जैन वय ४८ रा. मेनरोड तळोदा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने तळोदा येथुन खापर व अक्कलकुवा येथुन त्यांनी दिलेल्या मालाचे पैसे घेवुन निघाल्यानंतर अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ पंक्चर दुकानावर जावुन त्याच्याशी बोलत असतांना अज्ञात इसमांनी हुकुमचंद जैन यांच्या गाडीतील रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवलेले १ लाख १० हजार रुपये रोख चोरुन नेले म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हुकुमचंद घिसुमल जैन वय ४८ रा. मेनरोड तळोदा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोरोना महामारीमुळे व्यापाऱ्यांची हालाखीची परिस्थीती होती. त्यातच व्यापायाचे दिवसा १ लाख १० हजार रुपये चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते, त्याअनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी स्थानि गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांचेसोबत घडलेल्या घटनेबाबत गांभीर्याने चर्चा करुन गुनहा उघडकिस आणुन गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी निर्देश दिले.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेवुन तात्काळ तपासाची चक्रे फिरवत सदर गुन्ह्याचा तपास करणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत मार्गदर्शन करुन स्वतः ही आपल्या बातमीदारांमार्फत व जेलमधुन सुटुन आलेले व पॅरोल रजेवर आलेल्या मालमत्तेविरुध्दूच्या गुन्हेगारांची माहिती काढत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे सहाय्याने लक्कडकोट येथुन सुनिल खारक्या पाडवी वय 21 रा. लक्कडकोट ता. तळोदा यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमाकडे विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार रणजित रतिलाल वळवी, युवराज करमसिंग वळवी दोन्ही सर्व रा. लक्कडकोट ता. तळोदा, वसंत शेगा पावरा रा. रोझवा पुनर्वसन यांचे मदतीने केली असल्याची हकिगत कळविल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सर्व आरोपीतांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी देखील गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात चोरीस गेले रोख रुपये देखील लवकरात लवकर आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात येतील असे मा.पोलीस अधिक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी कळविले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक असई अनिल गोसावी, पोहेकॉ/ सजन वाघ, पोहेकॉ / मुकेश तावडे, पोना/ विशाल नागरे, पोना/ सुनिल पाडवी, पोना/ बापु बागुल, पोना / मनोज नाईक यांचे पथकाने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button