Ahamdanagar

आमदार लंकेंच्या कोविड सेंटरमध्ये पार पडला ऐतिहासिक विवाह सोहळा…..

आमदार लंकेंच्या कोविड सेंटरमध्ये पार पडला ऐतिहासिक विवाह सोहळा…..

अहमदनगर : राज्य सरकारच्या आदेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यानंतर आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.

लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड केअर सेंटरला मदत केली आहे. या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघात उभारलेलं भव्य कोविड सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, आता हे कोविड सेंटर नुकत्याच पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे यांच्यासह जनार्धन पुंजाजी कदम आणि राजश्री काळे या दोन जोडप्यांनी याच कोविड केअर सेंटरमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली आहे.

विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवांतर खर्च होत असतो. हाच खर्च टाळून ती रक्कम कोरोना रुग्णांच्या कामी यावी या उद्देशाने या दोन्ही जोडप्यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांना मास्क सॅनिटायझर, पीपीई कीट आणि आत्यवश्य औषधी दिली आहेत.

तसंच कोविड सेंटरमधील रुग्णच वऱ्हाडी मंडळी समजून त्यांना भोजन देखील दिलं. सध्या या विवाह सोहळ्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button