Yawal

हिंगोणा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन लेखी आश्वासनाने मागे!

हिंगोणा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन लेखी आश्वासनाने मागे!

शब्बीर खान यावल।

यावल : यावल तालुक्यातील ग्रामपंचायत हिंगोणे ता.यावल येथील 6 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आठ महिन्याचे पगार थकीत .. आहेत या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी या कर्मचाऱ्यांना
कमीतकमी चार महिन्याचे पगार करावेत या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दि. १ ऑक्टोबर२१ पासुन काम बंद सुरू केले होते व ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला होता कामबंद आंदोलनात :- १) शेख मुख्तार शेख रशिद – लिपीक २) गिरीष सिताराम राणे- लिपीक ३) प्रकाश रामचंद्र ठोंबरे- शिपाई ४) श्रीमती दिपाली कोमल वारके- शिपाई ५) रविंद्र सुपडू किरंगे – पाणीपुरवठा ६) सौ. अनिता युवराज धंजे – सफाई कर्मचारी
इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच रुकसाना फिरोज तडवी व ग्राम विकास अधिकारी श्री देवानंद भाऊ सोनवणे यांनी तातडीची मीटिंग काढून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 20 ऑक्‍टोबरपर्यंत चार महिन्याचे पगार देण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य सचिव अमृत महाजन यांना पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे तसेच . ग्रामपंचायत ने बनवलेला तातडीचे मिटींगला सरपंच सौ तडवी ग्राम विकास अधिकारी सोनवणे उपसरपंच सौ भैरवी भरत पाटील यांचे सह कविता विष्णू महाजन, सारिका किशोर सावळे, सागर महाजन भावना पराग कुरकुरे ,भूषण राणे, दिनकर जंगले .सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button