Motha Waghoda

कर्जोद येथील हिंदू-मुस्लिम बांधव गेल्या २० दिवसापासून परप्रांतीयांना सॅनिटायझरसह करताय अन्नदान…माणुसकीतून देतायेतत जातीय एकात्मतेचा संदेश

कर्जोद येथील हिंदू-मुस्लिम बांधव गेल्या २० दिवसापासून परप्रांतीयांना सॅनिटायझरसह करताय अन्नदान…माणुसकीतून देतायेतत जातीय एकात्मतेचा संदेश

प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

जळगांव जिल्ह्य रावेर तालुक्यातील कर्जोद येथील हिंदू-मुस्लिम समाज बांधव गेल्या २० दिवसापासून महाराष्ट्र व इतर राज्यातून परत आपल्या गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना तसेच वाहन चालकांना अन्नदान करीत असून आज ही सुरू आहे जेव्हा पर्यंत मजुरांनाचा ओघ राहील तेव्हा पर्यंत आम्ही जेनाचा कार्यक्रम सुरू ठवू असे निर्धार येथील नागरिकांनी घेतले आहे.महाराष्ट्रातील लोकांची सेवा व माणुसकी पाहून परप्रांतीय लोकं सुद्धा त्यांच्या राज्यात जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या लोकांचे गुणगान करताय.हे मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे. तसेज येणार्या प्रत्येक प्रवासी बांधवांना सॅनिटायझर ने निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटाईझ केले जातआहे येथील नागरिकांनी आता पर्यंत २० हजार लोकांना अन्नदान केले आहे.विशेष म्हणजे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यात उपवास ठेऊन इतक्या उन्हात सुद्धा येथील तरुण लोकांची सेवेत हजर आहे.या अद्भुत कार्यात शेख हाजी शेख अनिस मोहम्मद ताहेर,शेख शकील पत्रकार, शरीफ शेख, हाजी सरफराज शेख, मनोज पाठक, आशिष पाठक, चेतन महाजन वाघोड, कांतीलाल महाजन, सुनील पवार,आलीस शेख, सलीम शेख, सलमान शेख, रउफ शेख, अलीम शेख , रियाज शेख, शाहिद शेख, राजू इब्राहिम, कमरुद्दीन शेख,आसिफ भाई भांगर वाले, साबीर शेख, ताजु उस्ताद,यांनी परिश्रम घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button