Faijpur

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात

सलीम पिंजारी फैजपूर तालिका यावल

फैजपूर : फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे या वर्षीही 14 सप्टेंबर 20 21 या दिवशी ‘हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे यांनी भूषविले तर प्रमुख वक्ता म्हणून धुळे येथील एस .एस. व्ही. पी. एस .महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.अश्फाक सिकलगर यांनी ‘हिंदी भाषा में रोजगार के अवसर’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करून श्रोत्यांना विविध क्षेत्रात हिंदीचा बोलबाला कसा आहे यावर प्रकाश टाकला .अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे यांनी हिंदी दिनाच्या औचित्याने हिंदीला विविध क्षेत्रात असलेली आवश्यकता लक्षात घेऊन तिचा दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त वापर करून अजून ती भाषा कशी समृद्ध करता येईल याकडे लक्ष वेधले .तसेच हिंदी अखंड तेची भाषा आहे असे सांगितले विद्यार्थी जफर अली मणियार याने मनोगत व्यक्त केले .प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ.कल्पना पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रा.डॉ.विजय सोनंजे यांनी बहारदारपणे केले व आभार प्रदर्शन प्रा. सतीश पाटील प्रा.डॉ . ईश्वर ठाकूर प्रा.डॉ. आर .आर. राजपूत प्रा.डी. एल. सूर्यवंशी प्रा.अर्चना वराडे प्रा.डॉ. सविता वाघमारे प्रा.डॉ सीमा बारी प्रा. शेरसिंग पाडवी तसेच अनेक प्राध्यापक उपस्थित होते सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीची उपस्थितीही लक्षणीय होती सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button