Jalgaon

कॉपीची हायटेक पद्धत..! पोलीस भरती परीक्षेत घडला धक्कादायक प्रकार..!

कॉपीची हायटेक पद्धत..! पोलीस भरती परीक्षेत घडला धक्कादायक प्रकार..!

जळगाव येथे पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा संपन्न झाली.या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकार घडले असल्याची माहिती मिळाली आहे.यात एका परिक्षार्थीने केंद्रात मोबाईल घेऊन जात प्रश्नपत्रिकेचे फोटो मित्रास पाठवले. मित्राने उत्तरे पाठवल्यानंतर तो प्रश्नपत्रिका सोडवत असलेला आढळून आला. तर एकाने कानात ब्लु टूथ लपवून ठेवले होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी परिक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
नॉर्थ महाराष्ट्र क्नॉलेज सीटी कॉलेज या परिक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड वय २७, रा. पांझणदेव, पो. नागापुर, ता. नांदगाव, जि. नाशिक या उमेदवाराने परिक्षा दिली.त्याने एक मोबाईल थेट परिक्षा केंद्रात नेला. प्रश्नपत्रिका मिळताच त्याने फोटो काढुन घेत मित्राच्या मोबाईलवर पाठवले. यांनतर मित्राने प्रश्नांची उत्तरपत्रिका आव्हाडला पाठवली. हा प्रकार सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आला व त्याला रंगेहात ताब्यात घेतले. आव्हाड व त्याचा मित्र यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या एका घटनेत वाघनगर येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रतापसिंग गुलचंद बालोद वय २५, रा. वैजापुर, ता.औरंगाबाद याने एटीएम कार्डच्या आकाराचे एक डिव्हाईसमध्ये मेमरी कार्ड होते. अत्यंत लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवून ठेवला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने कसुन तपासणी करण्यात आली. परिक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, प्रतापसिंगच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button