Bollywood

हे आहेत भारतातील 13 धक्कादायक अनपेक्षित मृत्यू..!

हे आहेत भारतातील 13 धक्कादायक अनपेक्षित मृत्यू..!

मृत्यूला कोणीही जिंकू शकत नाही आणि कोणी हरवू शकत नाही. मृतर अंतिम सत्य आहे. जन्म आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार असतो. आणि हे प्रत्येकाला माहीत असत.तरीही मृत्यू म्हटला की प्रत्येक जण घाबरतो.मृत्यू कधी होणार हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे एखादी व्यक्ती अचानक मरण पावल्यास सर्वांना दुःख होत.

नुकताच बिग बॉस १३ चा विजेता, प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यु झाला आणि जीवन क्षणभंगुर आहे हे सिद्ध झाल.

भारतातील अनेक प्रसिद्ध लोकांचा असाच अनपेक्षित मृत्यू झाला आहे.

सिद्धार्थ शुक्ला

बालिका वधू ह्या टेलिव्हिजन वरील मालिकेतून प्रसिद्ध होऊन घरा घरात पोहचलेला सिद्धार्थचा अभिनय,मेहनत,सौंदर्य आणि फिटनेस इ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.त्याने अनेक हिंदी मालिका, चित्रपटा तुन काम केलं.मात्र बीग बॉग १३ मधून तो खूपच प्रसिद्ध झाला.तो खतरो के खिलाडीचा देखील विजेता होता.शारीरिक दृष्ट्या एकदम
फीट असलेल्या सिद्धार्थला वयाच्या अवघ्या चाळीशीत ह्रदयविकाराचा झटका येणं आणि त्याचा मृत्यू होणं हे अनेकांना अजूनही खर वाटत नाही.

सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूडचा गुणी आणि मेहनती अत्यन्त संघर्षांतून स्वतः च अस्तित्व बॉलिवूड मध्ये निर्माण करणारा चॉकलेटबॉय अशी ओळख असलेल्या सुशांत सिंगच्या मृत्यु देखील असाच धक्कादायक होता.मागील वर्षी १४ जून २०२० रोजी राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली.बॉलिवूडमधील नेपोटिझम, ड्र्ग्स असे अनेक विषय आणि गूढ असलेली ही केस मात्र गुलदस्त्यात आहे.

विलासराव देशमुख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांना २०११ साली सिऱ्हॉसिस नावाचा आजार झाला होता.
ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांचे यकृत व मूत्रपिंड निकामी झाले आहे असे डॉ नी निदान केले. त्यांना ६ ऑगस्ट रोजी एयर ऍम्ब्युलन्समधून तातडीने चेन्नई येथे लिव्हर ट्रान्सप्लांट साठी नेण्यात आले.पण तिथे त्यांचं ऑपरेशन होण्याच्या आदल्या रात्रीच त्यांचं अनपेक्षितपणे निधन झालं. त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.असे सांगण्यात आले.

लालबहादूर शास्त्री

स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान साधी राहणी उच्च विचारसरणी प्रमाणे जीवन जगणारे लालबहादूर शास्त्री यांचे निधन असाच एक वादाचा आणि न पटणारा विषय आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. पण त्यांचा मृत्यू हे आजही न उकललेले एक गूढ आहे.ताश्कंद येथे गेलेले असताना ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झाला असे सांगण्यात आले.परंतु त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांना कुणीतरी राजकीय हेतूने विषप्रयोग करून ठार मारण्यात आले असा संशय आहे.भारताचे पंतप्रधान असून आणि परदेशात असताना अचानक मृत्यू झाला असून देखील त्यांच्या पार्थिव शरीराचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले नाही.हे देखील विशेष च म्हणावे लागेल.

नेताजी सुभाषचंद्र बोस

भारताचे सशस्त्र क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या मृत्यूचे गूढ आजही उकलले नाही. त्यांचा मृत्यू अपघातात झाला होता.असे सांगण्यात आले. पण कारण ज्या प्रकारे हा अपघात झाला त्यावरून असाच संशय येतो की हे नेताजींविरुद्ध रचलेलं एक षडयंत्र होतं. १९४५ साली नेताजी टोकियोला जात होते, ह्या प्रवासादरम्यानच त्यांचे विमान कोसळले असं म्हणतात की ह्या अपघातातच जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पण इतका मोठा अपघात होऊन सुद्धा त्यांचं पार्थिव शरीर सापडलं नाही आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र देखील सापडलं नाही.

दिव्या भारती

गोल चेहऱ्याची अत्यन्त सुंदर बॉलिवूड ची गुणी अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू एक न उलगडलेले रहस्य आहे. अवघ्या 19 व्या दिव्याचा मृत्यू झाला हा मृत्यू संशयास्पद आहे.5 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. पण लोकांच्या मते तिला ढकलून देण्यात आले होते. तिला अंडरवर्ल्ड विषयी काहीतरी माहिती समजली होती आणि त्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजे साजिद नाडियादवाला याने तिला खिडकीतून ढकलून देऊन तिचा खून केला.असा दाट संशय लोकांना आहे.आत्महत्या करण्याचे कोणतेही ठोस कारण तिच्या कडे नव्हते.

डॉ होमी भाभा

भारतातील शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा हे भारतातील व जगातील सर्वात प्रसिद्ध न्यूक्लिअर फिजिसिस्ट होते. २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रांस मधील मॉँट ब्लॅक येथे झालेल्या एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा हा मृत्यू संशयास्पद होता. अमेरिकेच्या सीआयएने रचलेलं हे षडयंत्र असावं. भारताची आण्विक प्रगती रोखण्यासाठी आणि हानी करण्यासाठी सीआयएने योजना आखून डॉक्टर होमी भाभा ह्यांना ठार केलं गेलं. त्यावेळी ते फक्त ५६ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे भारताचं खूप मोठं नुकसान झालं.

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय राजकारणातील हिंदुत्व विचारांचे असून जनसंघाची स्थापना केली होती.१९५३ साली श्यामाप्रसाद मुखर्जी जम्मू काश्मीर येथे लागू झालेल्या परमिट सिस्टीमचा विरोध करण्यासाठी गेले होते.तिथे त्यांना ११ मे १९५३ रोजी अटक करण्यात आली. त्यांना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह तुरुंगात टाकण्यात आलं, पण नंतर गावाबाहेर असलेल्या एका घरात हलवण्यात आलं. तिथे त्यांची तब्येत ढासळू लागली.१९ आणि २० जून रोजी त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यांना खूप ताप आला. त्यांना छातीत इन्फेक्शन झालं होतं. २२ जून रोजी ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. आणि एकाच दिवसात संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.

गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते गोपीनाथ मुंडे ह्यांचा मृत्यू सुद्धा संशयास्पद परिस्थितीत झाला.३ जून २०१४ रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या पहिल्या मिटिंगसाठी ते जात होते. एका वेगात जाणाऱ्या गाडीने मुंडेंच्या गाडीला जोरात धडक दिली आणि त्यांना जोरदार झटका बसला.त्यांना त्वरित AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं पण नंतर त्यांची हृदयक्रिया बंद पडली. त्यांच्यावर CPR करण्यात आले पण त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

गुरुदत्त

हिंदि चित्रपट सृष्टीतील अत्यन्त गुणी आणि प्रसिद्ध अभिनेते असलेले गुरुदत्त यांचा मृत्यू देखील संशयास्पद आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले गुरु दत्त यांचा मृत्यू धक्कादायकहोता. त्यांना नैराश्य होते.आपल्या हसऱ्या चेहऱ्याखाली त्यांनी त्यांचे दुःख लपवून ठेवलं होतं.

गुलशन कुमार

टी सिरीज या कंपनीचे मालक आणि निर्माते गुलशन कुमार ह्याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.१२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील जीतेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. नेमक्या त्याच दिवशी उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेला त्यांचा सुरक्षारक्षक आजारी पडला होता. त्यांना ५ ऑगस्ट आणि ८ ऑगस्ट १९९७ रोजी खंडणीचे फोन आले होते.गुलशन कुमार ह्यांना तब्बल १६ गोळ्या लागल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, दाऊद इब्राहिम व डी कंपनी जबाबदार आहेत.

परवीन बाबी

बॉलिवूडमधील मॉडर्न अभिनेत्री म्हणून परवीन बाबीला ओळखले जाते. ती एक अत्यंत यशस्वी अभिनेत्री होती पण ती मानसिक रित्या फारच कमकुवत होती.कारण तिचे खाजगी आयुष्य फार चांगलं नव्हतं. तिला पॅरानॉईड सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता.तिच्या दारूच प्रचंड व्यसन होत. ती एकटीच राहत होती.२२ जानेवारी २००५ रोजी तिच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी पोलिसांत तक्रार केली की तिने घराबाहेर पडून असलेले दूध व वर्तमानपत्र गेले तीन दिवस उचललेच नाही. दार तोडून बघितले तेव्हा ती मृतावस्थेत आढळली.

श्रीदेवी

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार, मिस हवाहवाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी चा अकस्मात मृत्यू धक्कादायक होता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबई येथे हॉटेल रूममधील बाथरूममध्ये असलेल्या बाथटबमध्ये बोनी कपूर ह्यांना मृतावस्थेत आढळली. सुरुवातीला तिच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असं सांगितलं जात होतं, पण पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. श्रीदेवीच्या अनपेक्षित मृत्यू मुळे तिचा खरंच पाय घसरून पडली की बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला की तिनं आत्महत्या केली की तिचा खून झाला ह्याबाबतीत संशय आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button