Nashik

दिवाळी नंतर नाशकात हेल्मेट सक्ती होणार अधिक कडक, पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी धाडले आदेश

दिवाळी नंतर नाशकात हेल्मेट सक्ती होणार अधिक कडक,
पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी धाडले आदेश

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=दिवाळी नंतर नाशकात नो हेल्मेट, नो ऑपरेशन’ मोहिमेस अधिक कडक भाऊबीजे पासून सुरुवात होणार आहे. आज नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याबाबत सविस्तर आदेश काढले आहेत. हेल्मेट परिधान केल्याशिवाय दुचाकीस्वारास पेट्रोल किंवा डीझेल दिले जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत एक नमुना अ फॉर्म भरल्यानंतर पेट्रोल दिले जात आहे. तसेच भाऊबीजपासून हे निर्बंध अधिक कडक होणार असून हेल्मेट नसल्यास सहकार्य केले जाणार नाही. तसेच नियमभंग केल्यास थेट पोलीसाची कारवाई करण्यात येईल.

१.) विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल पंप परिसरात बंदी.
२). प्रत्येक पेट्रोल पंप चालक याबाबत फलकद्वारे जनजागृती करतील

३. )विनाहेल्मेट धारकांना पेट्रोल दिल्यास कडक कारवाई होणार

४.) शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंगची ठिकाणे, औद्योगिक वसाहती, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व इतर निमशासकीय कार्यालय येथेही विनाहेल्मेट दुचाकीस्वारास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

५.) वरील सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले असून विनाहेल्मेटधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे
६.) वरील ठिकाणी मालमत्ता ऑफिसर यांनी लक्ष ठेवायचे आहे, नियमांचे पालन न झाल्यास कडक कारवाई होणार आहे
७. )भरारी पथकांची नजर प्रत्येक ठिकाणी राहणार असून कडक कारवाई होणार आहे
८.) मालमत्ता ऑफिसर सोबत राडा घातल्यास दुचाकीस्वारा वर होणार फौजदारी गुन्हा

या आदेशाची सुरुवात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु होईल. असे आदेश आज आयुक्त पांडेय यांनी काढले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button