Amalner

तालुक्यात जोरदार पाऊस..!आस्मानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांसमोर सुल्तानी संकट..!लोक प्रतिनिधी आणि प्रशासनाने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा..!

तालुक्यात जोरदार पाऊस..!आस्मानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांसमोर सुल्तानी संकट..!लोक प्रतिनिधी आणि प्रशासनाने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा..!

अमळनेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून आता ह्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. गेल्या महिन्यात अजिबात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती. पावसाळा संपण्याच्या तयारीत असताना मात्र पावसाने बेहिशोबी कोसळायला लागला आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच आस्मानी संकट होते त्यात सुलतानी संकट कोसळले आहे.

तालुक्यातील लोक प्रतिनिधी गायब असून शेतकरी प्रश्नांबाबत अनास्था दिसून येत आहे. आधीच सानुग्रह अनुदाना संदर्भातील 35 गावांचा प्रश्न प्रलंबित आहे.त्यात आता लोक प्रतिनिधींची ही आद्य जबाबदारी आहे की हा प्रश्न तातडीने हाताळून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.सानुग्रह अनुदाना संदर्भात जो उशीर झाला तो आता होऊ नये असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. लोक प्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाईचा पाठ पुरावा करावा अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यात सध्या

Amalner Rainfall
14 September 2021

Amalner – 38.0 mm

Shirud- 5.0 mm

Patonda – 9.5 mm

Marvad – 9.0 mm

Nagaon – 16.0 mm

Amalgaon- 0.0 mm

Bharvas – 27.0 mm

Vavde – 35.0 mm

Total – 139.5 mm

Days Average- 17.44 mm

progressive – 464.28 mm

इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button