Nashik

न्यायालयाने जामीन फेटाळताच छातीत आली ‘कळ’ ; लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर थेट रुग्णालयात दाखलं

न्यायालयाने जामीन फेटाळताच छातीत आली ‘कळ’ ; लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर थेट रुग्णालयात दाखलं

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. छातीत दुखत असल्याचं कारण सांगून त्या रुग्णालयात अॅडमिट झाल्या आहेत. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत.
छाती दुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात
याआधी वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात होता. आता अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली. त्यामुळे त्या आज पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना ही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नेमके प्रकरण काय आहे ?
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

संबंधित लेख

Back to top button