Maharashtra

? Breaking…महाराष्ट्रात मान्सून दाखल पुढील चार दिवसांत या ठिकाणी मुसळधार पाऊस…

?Breaking…महाराष्ट्रात मान्सून दाखल पुढील चार दिवसांत या ठिकाणी मुसळधार पाऊस…

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे, ही माहिती आय एम डी हवामान विभागाकडून अधिकृत पने देण्यात आलेली आहे. यामध्ये ५ जून रोजी मान्सून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात सक्रिय झालेला आहे. याच पार्श्‍भूमीवर हवामान विभागाकडून पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील पर्जन्याचा अंदाज काढण्यात आला असून या बुलेटीन द्वारे पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात सोसाट्याच्या 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह, तसेच मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

महाराष्ट्रात मान्सून दाखल पुढील चार दिवसांत या ठिकाणी मुसळधार पाऊस. यामध्ये ५ जून ६ जून ७ जून आणि ८ जून या चार दिवशी मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह याचबरोबर प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बुलेटीन मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणाचा मान्सून अंदाज हा नकाशा सोबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

५ जून शनिवार रोजी महाराष्ट्रातील कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात यामध्ये मुंबई, पालघर, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यात मुसळधार व अति मुसळधार पाऊस वर्तवला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर तसेच या शेजारील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील काही भाग तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात ही अत्यंत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. याचबरोबर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुद्धा असेल. विदर्भामध्पाये ५ जून रोजी वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

६ जून रोजी ही कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रति वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये यवतमाळ वर्धा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

सोमवार ७ जून रोजी कोकण किनारपट्टीवर मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. याच बरोबर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये माध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. सोमवारी मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

८ जून मंगळवार रोजी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली, सातारा, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मराठवाड्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मंगळवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे फक्त एक दोन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे नाहीतर विदर्भात मंगळवारी पाऊस बघायला मिळणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button