Ahamdanagar

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पावसाच्या जोरदार तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान, पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश ?

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पावसाच्या जोरदार तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान, पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश ?

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव/पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.पावसाच्या पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात पाणी घुसल्याने शेळ्या, गाया,म्हशी, छोटी जनावरे म्रुत्यु मुखी पडली आहेत, अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.नदी वरील बंधारे, पुल,रस्ते, फळबागा, शेतातील पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे,आमदार मोनिकाताई राजळे,केदारेश्वर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे, अँड.शिवाजीराव काकडे,शिवशंकर राजळे,गोकुळ दौंड,क्षितिज घुले, ऋषिकेश ढाकणे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण,शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकडे,पाथर्डी चे तहसीलदार शामराव वाडकर यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तलाठी, ग्रामसेवक,क्रुषि अधिकारी यांच्या पंचनामे करण्यासाठी नेमनुका केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेउन नुकताच ग्रस्त कुटुंबाना नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील वरुर,भगुर,खरडगाव,आखेगाव, वडुले,वाघोली,निंबेनांदुर,आखतवाडे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ,त्रिभुवन वाडी, शिरापूर, कोरडगाव,तिसगावकासार पिंपळगाव , हनुमान टाकळी, कोपरे,सह अनेक गावांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. एकाच रात्रीत सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला आहे.मदतकार्य सुरु झाले आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button