Mumbai

पुढील 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस..!काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी…!

पुढील 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस..!काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी…!

मुंबई पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला आहे. मान्सून गायब झाल्यानंतर आता राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहेत.
आज नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button