Aurangabad

विहामांडवा येथे मुसळधार पावसाच्या पाण्याने संपर्क तूटला

विहामांडवा येथे मुसळधार पावसाच्या पाण्याने संपर्क तूटला

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पैठण तालुक्यातील विहामांडवा परीसरात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने विहामांडवा गावाचा संपर्क तूटला असून जनतेचे हाल होत आहे. विहामांडवा परीसरात मुसळधार पावासाने अख्खे विहामांडवा गाव जलमय झाले आहे. तसेच आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहे. तसेच आज विहामांडवा गावात आठवडी बाजार असून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विकायला आणला होता.

विहामांडवा येथे नदीला पूर आल्याने रस्त्याचा संपर्क तुटला परिणामी तीन ते चार तास लोकांना थांबावे लागले. विहामांडवा येथे येणारे बँक कर्मचारी शिक्षक व जीवनाश्यक वस्तू घेऊन येणारे गाड्या पाणी ओसरून जाई पर्यंत तिन ते चार तास रस्त्यावरच थांबून होते. यामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच पाणी येऊन नदीला पूर येत आहे, परिणामी संपूर्ण गावाचा संपर्क तुटत आहे. पूल व्हावा म्हणून वेळोवेळी निवेदने देऊनही काही उपयोग होत नाही. यामुळे विहामांडवा येथील जनता त्रस्त आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पूल करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button