Bharat

Dilache Talk..:होय ती फुलनच..एकच मर्दानी अन्यायाला टक्कर देणारी..बलात्काऱ्यांना योग्य ती शिक्षा देणारी..फुलन

Dilache Talk.. होय ती फुलनच…..एकच मर्दानी अन्यायाला टक्कर देणारी..बलात्काऱ्यांना योग्य ती शिक्षा देणारी..

देशात सतत महिलांवर अत्याचार होत असतात.शेकडो वर्षांपासून महिलांवर अन्याय होत आहेत, बलात्कार केले जातात, कोर्टात केसेस दाखल होतात. कधीतरी त्याचा निकाल लागतो,कधी आरोपींना शिक्षा होते तर कधी ते निर्दोष सुटतात. फक्त बलात्कार होतात असे नाही तर पण कौटुंबिक हिंसाचाराच्या शेकडो घटना घडत असतात. पण भारतीय स्त्री ही अश्या घटनांच्या विरोधात आवाज उठवत नाहीत.. नुकतेच मणिपूर येथील घटना आणि त्या बरोबरच देशातील ठीक ठिकाणी सातत्याने मुली महिलांवर होणारे अत्याचार , बलात्कार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घरात ,समाजात,देशात,कामाच्या ठिकाणी, शाळेत कुठेही मुली महिला सुरक्षित नाहीत.

देशात एकच एकच महिला होती की जिने तिच्यावर झालेल्या अन्यायाला अत्यन्त चोख प्रत्युत्तर दिले. बलात्काऱ्यांना चौकात गोळ्या झाडल्या…आणि योग्य ती शिक्षा दिली…

Dilache Talk..:होय ती फुलनच..एकच मर्दानी अन्यायाला टक्कर देणारी..बलात्काऱ्यांना योग्य ती शिक्षा देणारी..फुलन

  • काय आहे फुलन चा थरार…

आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा तिच्या आयुष्यात आला. जातिव्यवस्था, गरिबी, उच-नीच, भेदभाव, स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, यौनशोषण, बालविवाह, कर्मठपणा, अज्ञान, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, हुंडा, भ्रष्टाचार ह्या सर्वच गोष्टींची युक्त असलेला फुलनचा थरार…

फुलनचा एकूण जीवनसंघर्ष खूपच दुःखद आहे. जेंव्हा तिच्याबद्दल वाचतो, ऐकतो अंगावर काटा उभा राहतो. फुलनच्या जीवन संघर्षातून आपल्या समाजरचनेची घाणेरडी, काळी बाजू निदर्शनास येते. गुन्हेगार, पोलीस, डाकू आणि डाकूंचा राजकारणासाठी उपयोग करणारे मतलबी सत्ताधारी, अमानुषपणा, निदर्यता, अशा अनुभवांचं प्रत्ययकारी अनुभव पहिल्या नंतर मन अंतर्मुख होतं.

  • जन्म ते मृत्यू संघर्ष…

उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म झाला. वसंतोत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘फुलन’ ठेवण्यात आलं. तिचे वडील खूपच गरीब आणि दुर्बल होते, तर आई स्वभावानं कडक आणि रुबाबदार होती. फुलन तिच्या आईवरच गेली होती.लहानपणा पासूनच ती कोणाला घाबरत नसे.फुलनला तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार भावंडं होती. फुलन दुसऱ्या नं च अपत्य. घरात 18 विश्व दारिद्र्य.. अनेक जबाबदाऱ्या फुलन लहानपणा पासूनच सांभाळत होती..

Dilache Talk..:होय ती फुलनच..एकच मर्दानी अन्यायाला टक्कर देणारी..बलात्काऱ्यांना योग्य ती शिक्षा देणारी..फुलन

मोठ्या बहिणीच्या विवाहानंतर लगेच वयाच्या ११ व्या वर्षी फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या पुट्टीलाल नावाच्या व्यक्तीबरोबर झालं. त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. तिचं यौनशोषण केलं. तिचा मानसिक, शारिरीक छळ तो करत असे म्हणून फुलन दोन-तीन वेळा घरातून पळून गेली होती.परंतु पण तिला समजावुन पुन्हा त्या नराधमाच्या हवाली केलं गेलं. एक दिवस तिचा नवरा तिला एका बोटीवर सोडून पळून गेला. नंतर त्यानं तिकडे दुसरं लग्न केलं. फुलन तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता गावकरी तिचा छळ करू लागले. ‘नवरा सोडून आलेली रांड’ म्हणून तिला हिनवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि तिचा चुलत भाऊ (मायादीन) तिला धमकावू लागले.

वयाच्या १५ व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर. बलात्कार करणारा सरपंचाचा मुलगाच होता. फुलन त्याला काही उलटसुलट बोलली होती. फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली. तेव्हा इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकल. तिथं काही पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर अनेक अत्याचार केले गेले.. आणि तिला धमकीही दिली जात असे की, ‘कोणाला सांगू नकोस. अन्यथा आम्ही तुझ्या xxx मध्ये चटणी/मिरची टाकू…’ ती भीतीमुळे गुन्हा कबूल करून जेलमध्ये राहिली..

जेलमधून सुटल्यावर ती तिच्या गावी आली तर सरपंच आणि तिचा चुलत भाऊ ने तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर या डाकूला तिची सुपारी दिली नंतर काही डाकू येऊन फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार केला . हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवितो. पुढे त्याने फुलनशी लग्न केलेव्हीआणि तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतले..

येथेच फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. गरिबांवर कोणी अत्याचार केला तर त्याला शिक्षा करते. अनेक गरीब मुलींचं लग्न लावून देते. ते गरिबांसाठी एक प्रकारे मसीहा बनतात.

डाकू बनल्यानंतर फुलन पुट्टीलालनं केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्याचं ठरवते. ती त्याला ठार करते. सरपंच, पाटील व मायादीन यांनासुद्धा खूप बदडते. पुढे विक्रम मल्लाहचा मित्र असलेला डाकू श्रीराम (ठाकूर) – ज्याला स्वतः विक्रम जेलमधून सोडवतो – विक्रम मल्लाहला ठार करतो. फुलनला नागडी करून गावागावांत फिरवतो. तिच्यावर अनेक जणांना बलात्कार करायला लावतो आणि तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवतो. एके दिवशी एका ब्राह्मण व्यक्तीच्या मदतीनं फुलन तेथून पळून जाते. ही बातमी कळताच श्रीराम त्या ब्राह्मण व्यक्तीला जिवंत जाळतो.

तेथून पळून जाऊन फुलन काही डाकूंची मदत घेऊन एक नवीन गँग बनवते. ती श्रीरामनं केलेल्या विक्रमच्या खुनाचा व तिच्या सोबत केलेल्या बलात्काराचा सूड घेण्याचं ठरवते. ती श्रीरामला शोधत शोधत एका गावात येते. त्या गावामधील २२ ठाकूर व्यक्तींना गोळ्या घालून ठार करते.

ही बातमी आगीच्या वेगानं देशभरात पसरते. पोलिसांचा बंदोबस्त कडक होतो. फुलनवर सरकार एक लाखाचं बक्षीस जाहीर करतं. पण फुलन कोणाच्याच हाती येत नाही. श्रीरामला शोधत असतानाच तिला महिती मिळते की, श्रीराम ठाकूरला त्याच्याच भावानं ठार केलं आहे. पोलीस इकडे फुलनचा शोध घेत असतात. ती त्यांना जिंदा किंवा मुर्दा हवी असते. फुलनवर खूप दबाव निर्माण होतो. तिच्या कुटुंबावरही खूप अत्याचार केले गेले म्हणून त फुलन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते. १२ फेब्रुवारी १९८२ रोजी तीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.तेव्हा तिला बघण्यासाठी हजारो लोक येतात. ११ वर्षं विनाखटला जेलमध्ये राहून १९९४ मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. ती जेलमधून मुक्त होते…

त्यानंतर फुलनच्या आयुष्यात मोठा बदल होतो. ती १९९६ साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत जाते. १९९९ साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येते. २५ जुलै २००१ रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली जाते.

१९७६ ते १९८३ या काळात चंबळच्या खोऱ्यात फुलनचं राज्य होतं, दहशत होती. फुलनचा बालपणापासून ते शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू इथपर्यंतचा प्रवास काळीज चिरणारा आहे. तो वाचताना आपण थरारून, थिजून जातो.

होय मी फुलन ..होय मीच फुलन म्हणण्याची वेळ आली आहे.. प्रत्येक मुलीने महिलेने आता स्वतःच फुलन झाले पाहिजे..आणि बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत…

Leave a Reply

Back to top button