Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र…कोरडा खोकला आणी काही घरगुती उपचार

आरोग्याचा मुलमंत्र…कोरडा खोकला आणी काही घरगुती उपचार

वातावरण बदलंल तर सर्दी,खोकला होतोच. पण, जर खोकला बरेच दिवस राहीला तर मात्र खूप त्रास होतो. बदलत्या हवामानात आणि पावसाळ्यात तर, कोरडा खोकला (Dry Cough) झाल्याने खूप त्रास होतो. कोरड्या खोकल्यामुळे शरीर कमजोर होतं, घसा-छातीत दुखतं आणि इतरांनाही त्रास होतो. कोरोनाच्या (Corona) काळात, खोकल्यामुळे संसर्ग (Infection) होण्याची भीती आहे. शक्यतो साध्या उपचाराने खोकला बरा होतो.पण, काहीवेळा बराच काळ त्रास रहतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, काही घरगुती उपचारांनीही फायदा होतो.

१) पिंपळाची गाठ

कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, पिंपळाची गाठी उपयोगी येईल. पिंपळाची गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून नियमित घ्यावी. यामुळे कोरड्या खोकल्यात आराम मिळेल.

२) मध

कोरड्या खोकल्याच्या त्रासात मध आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मध अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यात उपयुक्त आहेत. याशिवाय घशातील खवखव कमी करण्यातही मध उपयोगी ठरू शकतं. कोरडा खोकला झाला असेल तर, दिवसातून दोनदा हर्बल टी किंवा लिंबू पाण्यात 2 चमचे मध मिसळून प्यावा.

३)मीठ पाणी

कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकल्यात घशाला आराम मिळतो. याशिवाय मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ कमी होते. यासाठी, एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ मिसळा. दिवसातून बर्‍याच वेळा गुळण्या केल्या तरी चालेल.

४) आलं

आल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. याने खोकल्यातही आराम मिळतो. काळी मिरी आणि आल्याचा चहा पिल्याने खोकला बरा होतो. मात्र याचा वापर कमी प्रमाणात करावा.

५)नीलगिरी तेल

खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.

६)पेपरमिंट
घश्यातली जळजळ आणि वेदना दूर करण्यात पेपमिन्टची मदत होऊ शकते. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिन्टचा चहा प्या.

वरील पैकी उपचार घेऊन सुद्धा खोकला थांबत नसेल तर जवळच्या डॉक्टरांना अवश्य भेटा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ

संबंधित लेख

Back to top button