Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र कोरोना नंतर आता AFM च संकट… लहान मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

आरोग्याचा मुलमंत्र

कोरोना नंतर आता AFM च संकट…
लहान मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

डेल्टा व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. लहान मुलांनाही याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात आता लहान मुलांवर आणखी एक संकट ओढावणार आहे. कोरोनानंतर आता लहान मुलांना एक्युट प्लेसिड म्येलिटिस (Acute Flaccid Myelitis) या आजाराचा धोका आहे. एएफएमबाबत पालक आणि डॉक्टरांना अलर्ट करण्यात आलं आहे.
पुढील चार महिन्यांत एक्युट प्लेसिड म्येलिटिस थैमान घालणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने याबाबत सावध केलं आहे. याबाबत एक रिलीज जारी करून सविस्तर माहिती आहे.

काय आहे AFM,.?

एएफएम हा पोलिओसारखा आजार आहे. गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामुळे विशेषतः पाठीच्या मणक्याजवळील क्षेत्र ज्याला ग्रे मॅटर म्हटलं जातं, त्यावर परिणाम होतो. यामुळे शरीरातील मांसपेशी कमजोर होतात. अमेरिकेत 2014, 2016 आणि 2018 साली या आजाराची बरीच प्रकरणं दिसून आली होती.

– एक्युट प्लेसिड म्येलिटिसची लक्षणं

शरीरात कमजोरी
श्वास घ्यायला त्रास
ताप
घसा आणि पाठीत वेदना
न्यूरोसंबंधित लक्षणं

2014 नंतर दर दोन वर्षे या आजारामुळे पॅरालिसिसची अनेक प्रकरणं समोर आली आहे. 2018 मध्ये याचा प्रकोप झाला होता. 42 राज्यांमध्ये 239 रुग्ण सापडले होते. त्यापैकी जवळपास 95 टक्के लहान मुलं होती, अशी माहिती सीडीसीने दिली आहे.
या आजारावर कोणतेही उपचार नाही. सुरुवातीच्या लक्षणांनुसार उपचार केल्यास परिणाम दिसून येतो. त्यामुळे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणं शक्य होईल. त्यामुळे वरीलपैकी लक्षणं दिसल्यास विशेषत: ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये असे रुग्ण आढळल्यास त्यांना एएफएमचे संशयित रुग्ण समजून तात्काळ रुग्णालयात दाखव करावं

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ

संबंधित लेख

Back to top button