Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र मोसंबी खाण्याचे आरोग्यास फायदे

आरोग्याचा मुलमंत्र

मोसंबी खाण्याचे आरोग्यास फायदे

आंबट- गोड मोसंबीचा समावेश आपल्या आहारात केल्यास उन्हाळ्यात होणा-या आजारापासून आपली नक्कीच सुटका होऊ शकते. मोसंबीमध्ये ‘व्हिटामिन सी’ आणि ‘पोटॅशिअम’चे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे त्याच्यात ‘फायबर’चे प्रमाणही अधिक आहे.

१. अनेकांना ‘व्हिटामिन सी’च्या कमतरतेमुळे ‘स्कर्वी’चा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये हिरड्यांमधून सतत रक्त येते. या आजारापासून सुटका करायची असेल तर मोसंबीचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘व्हिटामिन सी’ चे प्रमाण आढळून येते.

२. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अॅसिडीटी म्हणजेच अपचनाची समस्या वारंवार उद्भवत असते. यामध्ये सतत जळजळ होणे, अस्वस्थ वाटणे यासारख्या गोष्टींची लक्षणं आढळून येतात. आपली पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर अशी समस्या निर्माण होऊ शकते. मोसंबीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि पित्ता चे प्रमाण कमी होते.

३. मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींच्या खाण्यावर तर अनेक बंधने असतात. मात्र हा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर दोन चमचे मोसंबीचा रस, ४ चमचे आवळ्याचा रस, १ चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. अनेक वेळा काही जणांच्य़ा रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे ऐकण्यात येते. मात्र मोसंबीच्या सेवनाने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.

५. मोसंबीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने त्याच्या वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांना काही संसर्ग झाल्यास मोसंबीच्या रसाचे काही थेंब पाण्यात टाकून त्या पाण्याने डोळे धुतल्यास संसर्गापासून सुटका होते. तसेच मोसंबीमध्ये रोग प्रतिकारक शक्तीही मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे उन्हाळ्यातील आजारापासून सुटका करायची असेल तर आपल्या आहारात पालेभाज्या, पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Back to top button