Maharashtra

आरोग्या चा मुलमंत्र कांजण्या (लक्षणें, कारणे, उपचार)

आरोग्या चा मुलमंत्र

कांजण्या (लक्षणें, कारणे, उपचार)

कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत ‘नागीण’ या रोगाद्वारे प्रकट होतात.

कारणे

हा आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.

वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.

लक्षणे

कांजिण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे. बरे ना वाटणे आणि थोडा तापाने त्याची सुरवात होते. काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील 12ते 24 तासात पुरळावर खाज सुटते,पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनिमार्ग आणि गुदमार्गात पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर 250-500 पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजिण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.

निदान

लहान मुलांची बाबतीत कांजिण्याचे निदान घरी, शाळेतील परिचारिका, ग्रामीण भागात नोंदणी झालेली परिचारिका, आरोग्य सेविका , शिक्षक यांचाकडून होते. काहीं संशयास्पद वाटल्यास वैद्यकीय सल्ला टेलिफोनवरून मिळू शकतो. तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काहीं गोष्टींची खात्री करावी

रुग्णाचा ताप 102 डि फॅ हून अधिक ( 39.2 सें) . ताप चार दिवस उतरत नसेल

रुग्णाच्या त्वचेवरील पुरळामध्ये इतर संसर्ग झाल्याची शंका आल्यास.

मानसिक दृष्ट्या रुग्ण मंद, गोंधळलेले, प्रतिसाद देण्यास अक्षम, सतत झोप येणारे, आढळल्यास. मान ताठ होणे, तीव्र उजेडाकडे पाहण्यास टाळाटाळ करणे- उदा.खिडक्या उघडू ना देणे, चालताना तोल जाणे, सतत खोकला येणे, छातीत दुखण्याची तक्रार, उलट्या आणि फिटस आल्यास ही मेंदू ज्वराची किंवा रेये सिंड्रोमची लक्षणे शक्यता आहे. अशी स्थिति ओढवल्यास रुग्ण गंभीर आहे असे समजावे.

उपचार

कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके ॲंेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.
तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.

हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे मुख्यत्वे ताप नियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, Antiviral इत्यादी वापरले जातात.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button