Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र (बिछाना ओला करणे..) घरगुती उपाय

आरोग्याचा मुलमंत्र

(बिछाना ओला करणे..) घरगुती उपाय

लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या सामान्य समस्यांपैकी एक समस्या म्हणजे झोपेत लघुशंका करणे होय. तसं तर मुल जन्मापासूनच बसल्या जागी लघुशंका करत असतं. त्याला लघुशंका करण्याची जाणीव येईपर्यंत काही काळ जातो. जेव्हा मुलाला याबद्दल योग्य शिकवण मिळते तेव्हा मुल कुठेही लघुशंका करत नाही व हळूहळू झोपेत लघुशंका करण्याची त्याची सवय देखील निघून जाते. पण काही मुले अशी असतात ज्यांना लघुशंका करण्याची जाणीव तर झालेली असते पण झोपेत मात्र त्यांना ती जाणीव राहत नाही आणि हमखास रोज अशी मुले झोपेत लघुशंका करतात.

दालचिनी :-
दालचिनी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी व खोकला यांपासून देखील आराम मिळतो. एवढेच नाही तर दालचिनी रात्रीच्या वेळी लघुशंका करण्याच्या मुलांच्या समस्येला सुद्धा आळा बसवते. दिवसातून एकदा बाळाला दालचिनीची काडी चावायला द्यावी. जर मुल दालचिनी खाण्यास नकार देत असेल तर त्याची पावडर बनवून त्याला खाऊ घाला. यामुळे लवकर परिणाम दिसून रात्रीच्या वेळी झोपेत लघुशंका करण्याची मुलाची समस्या नक्कीच दूर होईल. अनेक घरांमध्ये एक घरगुती रामबाण उपाय म्हणून दालचिनीचा हमखास वापर केला जातो.

ओलिव्ह ऑईल :-
व्हिटॅमिन ए आणि ओमेगा अ‍ॅसिडने युक्त ओलिव्ह ऑईल मुलांच्या मेंदुंच्या विकासामध्ये खूप परिणामकारक ठरते. हे स्कीन आणि केसांना स्वस्थ राखण्यासोबत लहान मुलाची रात्रीच्या वेळी झोपेत लघुशंका करण्याची सवय सुद्धा कमी करते. ऑलिव्ह ऑईलचा उपाय करण्यासाठी थोडेसे ऑलिव्ह ऑईल घ्या आन ते हलके गरम करून सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे गोल गोल पद्धतीने मुलाच्या पोटावर लावून मालिश करा. रात्री झोपण्याआधी मुलावर हा प्रयोग काही दिवस करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. अनेक जाणकार देखील हा उपाय रामबाण असल्याचे सांगत ऑलिव्ह ऑईलचा आवर्जून वापर करण्याचा सल्ला देतात.

अ‍ॅप्पल साईड व्हिनेगर:-
अ‍ॅप्पल साईड व्हिनेगर मध्ये अनेक गुण असतात जे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर प्रभावी ठरतात. या समस्येमध्ये रात्रीच्या वेळी मुलाने लघुशंका करणे या समस्येचा देखील समावेश आहे. आहारात थोड्या प्रमाणात अ‍ॅप्पल साईड व्हिनेगर टाकून मुलाला सेवन करण्यास दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून देखील मुलाच्या शरीराचा बचाव होतो. हे पोट आणि मूत्राशय यामध्ये होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करते. यामुळे पोट व अ‍ॅसिडचा स्तर नियंत्रित राहतो ज्यामुळे लघुशंका करण्याची इच्छा कमी होते.

आवळा:-
आवळा प्रौढांसह लहान मुलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे लहान मुलांचा इन्फेक्शन पासून बचाव करण्यासह पचनशक्ती सुद्धा वाढवतात आणि बद्धकोष्ठतेला आळा घालतात. मूत्राशय किंवा आतड्यांमध्ये झालेल्या इन्फेक्शनवर सुद्धा आवळा प्रभावी ठरतो. यामुळे झोपेत लघुशंका करण्याच्या समस्यांपासून आराम मिळते. एक चमचा आवळा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि थोडी त्यात काळी मिरी टाका. हा काढा रोज बाळाला पाजा.

गुळ :-
असे म्हटले जाते की शरीरात उष्णता जास्त असेल तर रात्री झोपेत लहान मुलांना लघुशंका होत नाही. गुळ हा आयर्न अर्थात लोहाचा एक
स्त्रोत आहे आणि यामुळे पोट सुद्धा ठीक राहते. बाळाच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करण्यामुळे बाळाच्या शरीरात उष्णता टिकून राहते आणि या समस्येपासून बाळाला आराम मिळतो. एक चमचा गुळ एक ग्लास कोमट पाण्यामध्ये वा दुधामध्ये मिसळून बाळाला द्या. यामुळे हळूहळू बाळाची ही समस्या दूर होईल. तर मंडळी हे आहेत काही साधे सोप्पे उपाय जे तुमच्या मुलाला या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात आणि या समस्येमुळे तुम्हाला होणारा त्रास देखील संपवू शकतात. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणेकरून असा त्रास एखाद्या मुलाला होत असेल तर त्यालाही आराम मिळेल.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button