Maharashtra

आरोग्या चा मुलमंत्र केळी खाण्याचे आरोग्यास फायदे

आरोग्या चा मुलमंत्र

केळी खाण्याचे आरोग्यास फायदे

केळी असे एक फळ आहे जे कोणत्याही ऋतूत मिळतो. अशा या गुणकारी केळीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दिवसभर काही न खाता केवळ केळी जरी खाल्ली तर आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
केळी खाण्याचे फायदे
– केळी खाल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाष्ट्यात केळी खाल्ल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. केळी खाल्याने पचनक्रियाही सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास केळी उपयुक्त ठरते.

– जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर अशा वेळी फक्त केळी जरी खाल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. प्रवासादरम्यान केळी खाल्याने कफचा त्रासही दूर होतो.

– केळीत असणाऱ्या ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप फायदेमंद आहे.

– दररोज केळी खाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

– दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते.

– दारू पिल्याने चढलेली नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेक लाभदायक असतो.

– दररोज २ केळी आणि मध खाल्याने हृदयाचे आजार कमी होतात.

– नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास केळी, साखर आणि दूध यांचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.

– गर्भवती महिलांनी केळी जरूर खाल्ली पाहिजे.

– केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबरमूळे वृद्धांना होणारे आजार कमी करण्यासाठी केळी उपयुक्त मानले जाते.

– केळी खाल्याने मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायदेमंद होतात.

– केळीच्या सालीची पेस्ट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button