India

Health..आरोग्याचा मुलमंत्र..दही खाण्याचे फायदे

Health..आरोग्याचा मुलमंत्र..दही खाण्याचे फायदे

दह्यात कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-D चे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे दही खाणे हे आपल्या हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय दही खाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोकाही कमी होतो. दह्यात प्रोबायोटिक्स हे घटक असतात.
जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरते.

• दही खाण्याचे महत्त्वाचे फायदे :

– दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.

– केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

– दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

– दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते.

– दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.

– चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button