Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र आरोग्यास लाभदायक “सिताफळ”

आरोग्याचा मुलमंत्र

आरोग्यास लाभदायक “सिताफळ”

सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

सीताफळ खाण्याचे फायदे :-

सीताफळ हे हृदयाचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते.

सीताफळामधील व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते

टाइप – २ मधुमेहाचा धोका कमी करू शकतो

दररोज एक सीताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांना त्रास कमी होतो.

कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सीताफळाचे सेवन उपयुक्त ठरेल

गरोदरपणात दररोज सीताफळ घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होतो

सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खा

स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम

शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते

हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यास मदत

हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ फायदेशीर आहे.

नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते

शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर असते.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथी तज्ञ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button