Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र लिंबाच्या वापराने त्वाचेची काळजी

आरोग्याचा मुलमंत्र

लिंबाच्या वापराने त्वाचेची काळजी

लिंबू म्हटलं की, विटामिन सी साठी याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो हे सगळ्यांनाच माहीत आहे. शरीरात आणि अगदी त्वचेलाही विटामिन सी मिळावे यासाठी आपण अगदी लिंबू खाण्यापासून ते लिंबाचा रस आणि साल अथवा लिंबाच्या सालीची पावडर चेहऱ्याला लावण्यापर्यंत विविध वापर आपण करून घेत असतो. असाच लिंबाचा वापर त्वचेसाठी अन्य प्रकारे कसा होतो आणि त्याचे त्वचेला नक्की काय फायदे मिळतात हे आपण पाहूया…

१) बऱ्याचदा उन्हात काम करत असल्याने अथवा उन्हाच्या त्रासाने शरीरावर आणि चेहऱ्यावर काळे डाग आणि टॅन निर्माण होतात. यावर लिंबू हे नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतं. त्वचेवरील टॅन काढून त्वचा अधिक उजळवण्याचे काम लिंबू यामध्ये करते.

साहित्य – लिंबू, दही

कसा कराल वापर – दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्याला आणि मानेवर लावा. काही मिनिट्स हे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

काय होतो फायदा – लिंबू आणि दही याचे मिश्रण हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. तसेच दह्यामध्ये मिक्स केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी याचा अधिक चांगला उपयोग होतो. मात्र याचा वापर करून झाल्यानंतर चेहऱ्याला मॉईस्चराईज करायला विसरू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅन आणि काळे डाग निघायला नक्कीच मदत मिळते.

२) ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही चेहऱ्याला कोणतेही उत्पादन लावू शकत नाही. मग घरच्या घरी तुम्हाला उत्कृष्ट पर्याय आहे तो म्हणजे लिंबू. तेलकट त्वचेसाठी लिंबाचा आपल्याला चांगला फायदा करून घेता येतो. यातील अँटिसेप्टिक गुण अॅक्ने काढण्यासाठी आणि विटामिन सी अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते.

साहित्य – मध, हळद, लिंबाचा रस

कसा कराल वापर – एक चमचा मधामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

काय होतो फायदा – हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. त्याचप्रमाणे मध आणि लिंबाचे मिश्रण हे चेहऱ्यावरील आँक्ने काढून टाकण्यास लाभदायक ठरते. अँटिसेप्टिक असल्याने अतिरिक्त तेलही यातून शोषून घेतले जाते. त्यामुळे आठवड्यातून एक वेळा तरी तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून पाहू शकता.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button