India

आरोग्याचा मुलमंत्र ..पिंपळा चे आरोग्यदायी फायदे

आरोग्याचा मुलमंत्र ..पिंपळा चे आरोग्यदायी फायदे

पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाचं मूळ हे खूप दूरवर पसरतं. अनेक जुन्या पुराण्या आयुर्वेदीक ग्रंथामध्ये पिंपळाचं झाड आणि त्याच्या पानाबद्दल अनेक गुण सांगण्यात आले आहेत.
पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत असतं. पण त्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं गेलं आहे पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. पिंपळाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हे असं झाड आहे जे दिवसातील चोवीस तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं.

१) दातांसाठी
पिंपळाची साल पाण्यात उकळून घेऊन त्याची चूळ भरल्यास, दातांचे आजार बरे होतात. तसंच पिंपळाची ताजी वेल घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात. तसंच दातदुखी बंद होते. तसंच हिरड्यांची सूज आणि तोंडातून येणारी दुर्गंधीदेखील निघून जाते. याशिवाय तुम्ही पिंपळाची साल, कत्था आणि 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या आणि याची पावडर तुम्ही रोज दाताला लावलीत तर तुम्हाला दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.

२) श्वासाच्या त्रासावर गुणकारी :-
बऱ्याच जणांना श्वासाचा अथवा दम्याचा त्रास असतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सुक्या फळांचा उपयोग करून घेऊ शकता. पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण 2-3 ग्रॅम या प्रमाणात 14 दिवस पाण्यातून सकाळ – संध्याकाळ तुम्ही घ्या. यामुळे श्वासाचा आजार आणि खोकलादेखील जातो.

३) जुलाब :-
पिंपळाची वेल, धणे अथवा खडीसाखर याचा समसमान भाग तुम्ही एकत्र करून घ्या. रोज सकाळ संध्याकाळ साधारण 3-4 ग्रॅम तुम्ही हे मिश्रण खाल्ल्यास, तुम्हाला नक्की लाभ होईल. तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असल्यास, लगेच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

४) सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी :-
पिंपळाची फळं आणि सालं दुधामध्ये घालून उकळवा. त्यामध्ये साखर आणि मध मिसळून प्यायल्यास, सेक्शुअल स्टॅमिना वाढतो. तसंच पिंपळाची फळं अथवा मूळ सुंठीसह मिसळून दुधात घालून उकळून घ्या आणि तेदेखील तुम्ही पिऊ शकता. तसंच यामध्ये खडीसाखर अथवा मध मिसळून तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास, शारीरिक कमतरता निघून जाते.

५) रक्तविकारावरही होतो फायदा :-
वातरक्त अथवा रक्तविकारांवरही पिंपळाच्या सालांचा उपयोग होतो. तुम्ही साधारण पिंपळाच्या 40 मिली काढ्यामध्ये 5 ग्रॅम मध मिसळा. हे तुम्ही रक्तविकार असणाऱ्या रूग्णाला द्या. 1-2 ग्रॅम पिंपळाच्या बियांचं चूर्ण तुम्ही मधासह रोज चाटल्यास, तुमचं रक्त शुद्ध होतं हे लक्षात ठेवा.

६) सर्दी-खोकला :-
सर्दी, खोकला हे तर अगदी कॉमन आहे. तसंच जसं वातावरण बदलतं तसा सर्वात पहिला त्रास होतो तो सर्दी आणि खोकल्याचा. त्यासाठी तुम्ही पिंपळाची पाच पानं दुधामध्ये उकळून घ्या आणि त्यामध्ये साखर घाला आणि दिवसातून दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही हे प्यायलात तर तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथिक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button