Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र पेरू एक आरोग्यदाई फळ – झाड.

आरोग्याचा मुलमंत्र

पेरू एक आरोग्यदाई फळ – झाड.

पेरूचे सेवन केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. फळा प्रमाणेच पेरू ची पणे ही खूप औषधी गुणधर्माने भरलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, केस आणि त्वचेसाठी लाभदायी म्हणून पेरूची पाने देखील वापरली जातात. त्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे त्वचेच्या संसर्गाची समस्या रोखतात
पेरूच्या पानांमध्ये पोटॅशियम, फॉलिक आम्ल असते. हे घटक आपल्या त्वचेसाठी हे सुपरफूड आहेत. जर मुरुम, पिटिकांचे डाग, पिग्मेंटेशन आणि अकाली वृद्धत्वाच्या खुणा या समस्येमुळे आपण त्रस्त असाल, तर आम्ही आपल्याला पेरू पानांचे घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. चला तर, त्या उपायांबद्दल बघुयात…

१) चमकदार त्वचा
कोरड्या व निर्जीव त्वचेपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, पेरूच्या पानांची पेस्ट चेहर्‍यावर लावा. ही पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा

२) स्काल्पसाठी फायदेशीर
केसांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी स्काल्प मजबूत असणे गरजेचे असते. पेरूच्या पानांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे स्काल्पला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

३) ब्लॅक हेड्स
जर, आपल्याला ब्लॅक हेड्सचा त्रास होत असेल, तर पेरूची पाने बारीक पेस्ट करून चेहर्‍यावर लावावीत. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि नंतर स्क्रबप्रमाणे संपूर्ण चेहरा घासून घ्या. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास ब्लॅक हेड्सची समस्या दूर होईल.

४) अँटी-एजिंग
पेरूच्या पानांमधे असलेले अँटी-ऑक्सिडेंट वृद्धापकाळाच्या रेषा आणि फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच, ते आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील मदत करतात.

५) डार्क स्पॉट्स
चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी, दररोज पेरूची पाने बारीक वाटून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button